Uncategorized

माजलगाव बाजार समितीमध्ये काट्याची टक्कर-१८ पैकी १२ जागांवर सोळंके गटाचा विजय,भाजपने राष्ट्रवादीच्या गडात सेंध मारली


माजलगाव : लोकाशा न्युज
येथील बाजार समिती संचालक मंडळाच्या पहिल्यांदाच रंगतदार झालेल्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान होऊन त्यात आमदार प्रकाश सोळंके यांनी १८ पैकी १२ जागा जिंकल्या असल्या तरी भाजपाचे मोहनराव जगताप, नितीन नाईकनवरे यांनी काट्याची टक्कर देवुन सोळंके यांच्या गडात सेंधमारी करीत आ. सोळंके गटाचा तंबु हलवुन सोडला.
अतिशय अटीतटीच्या झालेल्या निवडणूकीत आ. सोळंके गटाचे सर्वच्या सर्व जागा निवडून येतील असा अती आत्मविश्वास दाखवला नेमका तोच सोळंके यांना नडला. मतमोजणीच्या सुरुवातीलाच हमाल मापाडी मतदार संघातून अपक्ष उमेदवाराने सोळंके यांच्या भरवशाच्या उमेदवाराची विकेट काढल्याने राष्ट्रवादीच्या तंबुत भयाण शांतता पसरली सोसायटी मतदार संघात विजय मिळाला असला तरी तो फारच अल्पमताचा विजय ठरला. ग्रामपंचायत गटात ज्या नितीन नाईकनवरे यांना पाडण्यासाठी आमदारांनी प्रतिष्ठा पणाला लावली तिथे नितीन नाईकनवरे यांनी सोळंके यांना आस्मान दाखवले त्यामूळे आगामी काळात आमदार सोळंके यांच्यासाठी ही धोक्याची घंटा म्हणावी लागेल.
सकाळपासूनच मतदारांमध्ये मतदानासाठी उत्साह दिसून आला. दुपारी तीन वाजेपर्यंत ९६.९३ टक्के मतदान शांततेत झाले.
सोसायटी मतदारसंघात ११ जागांसाठी ६०९ पैकी ६०१ मतदारांनी हक्क बजावला, ग्रामपंचायत मतदार संघात ४ जागांसाठी ५५३ पैकी ५४९ मतदारांनी हक्क बजावला, व्यापारी मतदार संघात २ जागांसाठी ७८५ पैकी ७३३ मतदारांनी हक्क बजावला तर हमाल मापाडी मतदार संघात १ जागांसाठी २३३ पैकी २३० मतदारांनी हक्क बजावत एकूण २१८० मतदारांपैकी २११३ मतदारांनी मतदान केले.पंचायत समिती सभागृहात सहाय्यक निबंधक विकास जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली मतमोजणी होऊन त्यात हमाल-मापाडी मधून कदिर शेरखान पठाण हे अपक्ष विजयी झाले.व्यापारी मतदारसंघात प्रभाकर होके व जुगलकिशोर नावंदर हे विजयी झाले.सोसायटी मतदारसंघात आमदार प्रकाश सोळंके गटाचे अशोक डक,जयदत्त नरवडे,डॉ उद्धव नाईकनवरे,वीरेंद्र सोळंके,भागवत शेजुळ,दत्तात्रय डाके,संजय कचरे .महिला मधून अंजली भोसले,सरस्वती घायतीडक, श्रीहरी मोरे विजयी झाले तर ग्रामपंचायत गटातून नितीन नाईकनवरे, भागवत शेजुळ आदींचा विजय झाला.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!