धारूर, दि. 26 (लोकाशा न्यूज) : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान 2019-20 अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेची विभागस्तरीय तपासणी समितीने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे विभागस्तरीय तपासणी झाली होती, त्यात आवरगाव ग्रामपंचायत ही विभागातून प्रथम क्रमांकावर येऊन प्रथम पुरस्कारास पात्र ठरली होती, त्याचे बक्षीस वितरण सोहळा दि. 25 एप्रिल रोजी संपन्न झाला. यावरूनच आवरगाव ग्रामपंचायत आता जिल्ह्याबरोबरच मराठवाड्यात पहिल्या फळीत आली आहे.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान 2019-20 अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेची तपासणी होऊन आवरगाव ग्रामपंचायत हि प्रथम आली होती, त्याचे बक्षीस वितरण मंगळवार दिनांक 25 एप्रिल 2023 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे श्री.अविनाश पाठक, अप्पर विभागीय आयुक्त,औरंगाबाद, उपायुक्त (विकास) श्रीमती उज्वला बावके मॅडम, उपायुक्त (विकास)आस्थापना श्री.सुरेश बेधमुत्था यांच्या हस्ते प्रमाणपत्र,सन्मानचिन्ह व पाच लाख रूपयांचा धनादेश देऊन सन्मान सरपंच,ग्रामसेवकांसह ग्रामस्थांचे अभिनंदन केले. यावेळी सन्मान स्वीकारताना गावचे आदर्श सरपंच अमोल जगताप, आदर्श ग्रामसेवक बाळासाहेब झोंबाडे, गंगाधर जगताप, किशोर जगताप, पत्रकार अविनाश जगताप यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान मागच्या तीन वर्षांपूर्वी आवरगाव ग्रामपंचायत ही विभागात प्रथम आलेली होती तिचा निकाल जाहीर झाला होता पण प्रत्यक्षात प्रमाणपत्र,सन्मानचिन्ह व धनादेश मिळणे बाकी होते पण दि 25 एप्रिल रोजी हा सन्मान विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे प्रमाणपत्र,सन्मानचिन्ह व धनादेश देऊन सन्मान झाला याचा आनंद खूप मोठा आहे व गावकर्यांचा आनंद हा गगनात मावेनासा झाला आहे.
आवरगाव ग्रामपंचायत विभागासह राज्यात
व देशात आदर्श असणार – सरपंच अमोल जगताप
आदर्श आवरगाव ग्रामपंचायत हि तालुका जिल्हा व विभाग पातळी वर प्रथम क्रमांकावर आलेली आहे त्यात विभागाचे बक्षीस खूप दिवसाच्या प्रतिक्षे नंतर आज आज प्राप्त झाले त्याचा आनंद सर्व ग्रामस्थांच्या मध्ये आहे व यापुढे हि गावातील एकीकरण ठेऊन गावच्या विकासा साठी व ग्रामस्थांना सोबत घेऊन विकासकामे करणार असून आवरगाव ग्रामपंचायत चे नाव हे विभागा पर्यंत तर पोचले आहे परंतु राज्यात व नंतर देशपातळीवर ही पोहोचवणार असल्याचा विश्वास सरपंच अमोल जगताप यांनी बोलून दाखविला आहे.
सर्वांच्या मेहनतीचे हे फळ – ग्रामसेवक बाळासाहेब झोंबाडे
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान 2019-20 अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेचे विभागस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला पुरस्कार स्वीकारताना मनस्वी आनंद झाला,मार्गदर्शन व सहकार्य करणार्या आवरगाव ग्रामस्थांचे मी आभार मानतो त्यांच्या मेहनीतीचे फळ मिळाले आहे,मिळालेल्या या सन्मानातून व पुरस्काराच्या रक्कमेतून जनतेला चांगल्या आणी दर्जेदार सेवा देणार आहोत आणी आवरगाव एक आदर्श गाव देशपातळीवर पोहोचण्यासाठी आणखी जोमात काम करण्याचा संकल्प करत आहोत.यावेळी बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अजित पवार साहेब उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री ज्ञानोबा मोकाटे साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळणार असल्याचा विश्वास ग्रामसेवक बाळासाहेब झोंबाडे यांनी बोलून दाखविला.