पुणे, 17 एप्रिल : गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार हे नारज असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. आज अजित पवार यांनी आपला सासवडमधील कार्यक्रम अचानक रद्द केल्यानं चर्चेला उधाण आलं आहे. अजित पवार हे सासवडमध्ये शेतकरी मेळाव्याला संबोधित करणार होते, मात्र त्यांनी आपले सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. मात्र या मेळाव्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रम रद्द
एकीकडे अजित पवार यांचे सासवडमधील सर्व कार्यक्रम अचानक रद्द झाले आहेत. तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीला पोहोचले आहेत. बावनकुळेंचा अचानक दिल्ली दौरा आणि दुसरीकडे अजित पवार यांनी सासवडमधील सर्व कार्यक्रम स्थगित केल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.