बीड, दि.13 (मुकेश झनझने) ः महसूल विभागातील उपजिल्हाधिकारी संवर्गातील अधिकार्यांच्या काल बदल्या झाल्यानंतर गुरूवारी तहसीलदार संवर्गातील अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या बदल्यांमध्ये औरंगाबाद, अमरावती, नागपूर, पुणे, नाशिक आणि कोकण विभागातील तहसीलदारांचा समावेश आहे. औरंगाबाद विभागातील बीड जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाचे तहसीलदार महसूल 2 संतोष बनकर याची बदल करण्यात आली असून त्यांच्या जागी आता औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयातील महसूल 2 चे तहसीलदार नरेंद्र कुलकर्णी यांना नियुक्ती देण्यात आली आहे. तर शिरूर कासारचे तहसीलदार श्रीराम बेंडे यांच्या याची बदली झाली असून त्यांच्या जागी आता मुळशीचे (जि.पुणे) तहसीलदार अभय चव्हाण यांना नियुक्ती देण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्यातून बदली झालेल्या दोन्ही तहसीलदारांना अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही.