बीड, दि.11 : नेटच्या प्रॉब्लेममुळे येथील रजिस्ट्री ऑफिसमध्ये नेहमीच रजिस्ट्रीची कामे मध्येच बंद पडतात, असाच अनुभव मंगळवारी अनेक नागरिकांना आला, सकाळपासूनच नेट नसल्यामुळे रजिस्ट्रीची कामे दिवसभर करता आली नाहीत, दिवसभरात रजिस्ट्रीची कामे न झाल्यामुळे बाहेरून आलेल्या नागरिकांचा यावेळी चांगलाच हिरमोड झाला होता. प्रशासनाच्या अशा ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना प्रचंढ मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे, याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देण्याची मागणी होत आहे, आज रजिस्ट्रीची कामे करता आली असती मात्र नेटच्या प्रॉब्लेममुळे ती झाली नाहीत, उद्यापासून तर 10 दिवस लॉकडाऊन आहे, त्यामुळे 21 ऑगस्टनंतरच आता नागरिकांना आपली रजिस्ट्रीची कामे करता येणार आहेत.सध्या कोरोनाने प्रत्येक क्षेत्राला घेरलेले आहे, कोणते ठिकाणी कधी बंद होईल हे निश्चित सांगता येत नाही, बीडमध्येही सद्या अशीच परिस्थिती आहे, कोरोनाची वाढती रुग्ण संख्या रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 11 ऑगस्टच्या मद्यरात्रीपासून ते 21 ऑगस्टप्रयत्न बीडमध्ये लॉककडाऊन जाहीर केलेला आहे, त्यामुळे आपली रजिस्ट्रीची कामे उरकून घेण्यासाठी मंगळवारी सकाळपासूनच येथील रजिस्ट्री कार्यालयात नागरिकांनी हजेरी लावली होती, अनेक जण बाहेर गावावरून या कामासाठी आले होते, मात्र सकाळपासूनच येथील नेट बंद पडले होते, सदर प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ते दिवसभर बंदच होते, त्यामुळे रजिस्ट्रीची कामेही दिवसभर बंदच होती, यामुळे अनेकांचा चांगलाच हिरमोड झाल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे प्रशासनाच्या अशा ढिसाळ कारभारामुळे वारंवार नागरिकांना प्रचंढ मानसिक आणि आर्थिक त्रास होत आहे, याकडे स्वतः जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देण्याची मागणी होत आहे. वास्तविकता उद्यापासून बीडमध्ये 10 दिवस म्हणजेच 21 ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन आहे, त्यामुळे येथील रजिस्ट्री ऑफिसमध्ये ही नागरिकांना येता येणार नाही, परिणामी आता नागरिकांना आपली रजिस्ट्रीची कामे लॉकडाऊन उघडल्यानंतरच करता आहेत.