परळी वैजनाथ।दिनांक ०६।
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या सूचनेनुसार शहरात आज भारतीय जनता पक्ष-शिवसेनेच्या वतीने सावरकर गौरव यात्रा मोठया उत्साहात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडली. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जयघोष करत वाजत-गाजत, फटाक्यांच्या आतिषबाजीत निघालेल्या मोटरसायकल रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
राहूल गांधी व अन्य काँग्रेसी नेत्याकंडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अवमान केला जात आहे, त्याला उत्तर म्हणून शहरात आज सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. आहे. सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीला सुरवात झाली. वाजत-गाजत, फटाक्यांच्या आतिषबाजीत निघालेल्या या रॅलीत युतीच्या कार्यकर्त्यांनी गळ्यात गमचा आणि डोक्यावर “मी पण सावरकर” लिहिलेल्या टोप्या परिधान केल्या होत्या. रॅली दरम्यान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जयघोष करत ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून निघून बस स्टँड रोड – एक मिनार चौक – अग्रवाल लाॅज – स्टेशन रोड- रामपालजी लोहिया यांचे दुकानाचे काॅर्नर – सुभाष चौक – रोडे चौक – राणी लक्ष्मीबाई टॉवर मार्गे श्री हनुमान मंदिर (मोंढा मार्केट) येथे रॅलीचा समारोप महा आरतीने करण्यात आला. भाजप-शिवसेनेचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व आघाड्यांचे प्रमुख, संस्थांचे पदाधिकारी तसेच सावरकर प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते. शहर पोलिसांचा चोख बंदोबस्त यावेळी होता.
••••