Uncategorized

बीडमधील 4200 माजी सैनिक केंद्र सरकारच्या विरोधात उतरले रस्त्यावर, दिल्लीतील धरणे आंदोलनाला 45 दिवस होवूनही केंद्र सरकार सैनिकांच्या मागण्या पुर्ण करेना, बीडच्या संघटनेने धरणे आंदोलनाला दिला जाहिर पाठिंबा,तात्काळ मागण्या पुर्ण केल्या नाहीत तर पुर्ण संसदेला घेराव घालणार – विद्या सानप, कलेक्टरांमार्फत सरकारला पाठविले पत्र


बीड, दि. 3 (लोकाशा न्यूज) : केंद्र सरकार भ्रष्टाचार करणार्‍यांना आधार तर देशाचे रक्षण करणार्‍या सैनिकांना मात्र आधार देत नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. कारण सरकार सैनिकांच्या मागण्या मान्य करण्यास तयार नसल्याचे समोर येत आहे. वेगवेगळ्या मागण्यांसाठी मागच्या 45 दिवसांपासून माजी सैनिकांचे दिल्लीतील जंतर मंतरवर धरणे आंदोलन सुरू आहे, या आंदोलनाची सरकारने अजून दखल घेतलेली नाही, त्यामुळेच बीडमधील माजी सैनिकांच्या संघटनेत सरकारविषयी प्रचंड रोष निर्माण झाला आहे. त्यामुळेच सरकारच्या विरोधात बीडमधील तब्बल 4200 माजी सैनिक रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देवून सरकारने जर सैनिकांच्या मागण्या पुर्ण केल्या नाहीत तर आम्ही सर्वजण मिळून संसदेला घेराव घालू असा ईशारा माजी सैनिक संघटनेच्या विद्या सानप, खोटे, बळीराम राख यांच्यासह सर्व तालुका संघटनेने सरकारला दिला आहे. त्यांनी बीडच्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांना लेखी निवेदन दिले आहे.

बीड जिल्ह्यात माजी सैनिकांची संघटना आहे, यातील 4200 माजी सैनिक पेन्शनर आहेत. मागच्या अनेक वर्षांपासून सैनिकांना न्याय देण्याबरोबरच त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी बीडची ही संघटना धडाडीने काम करीत आहे. वास्तविक पाहता देश स्वतंत्र होवून पंच्चाहत्तर वर्ष होवून गेली, असे असतानाही सैनिकांसोबत सरकारकडून सातत्याने भेदभाव केला जात आहे. या अन्यायाविरोधातच 20 फेब्रुवारी 2023 पासून दिल्लीच्या जंतर मंतरवर माजी सैनिकांचे धरणे आंदोलन सुरू आहे. या धरणे आंदोलनाला बीडमधील माजी सैनिकांकडून पाठिंबा देण्यात आला आहे. हा पाठिंबा तन, मन आणि धनाने दिलेला आहे. माजी सैनिकांना पेन्शनच एक जगण्याचे साधन आहे, अशा वेळी मात्र सरकारकडून सैनिक आणि माजी सैनिकांवर मोठा अन्याय होत आहे. होत असलेला हा अन्याय दुर केला नाही तर आम्ही दिल्लीतील धरणे आंदोलनात सहभागी होवून ते आंदोलन आणखी तिव्र करू, याला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार असेल, कारण आंदोलन सुरू होवून 45 दिवस पुर्ण झाले तरी सरकारकडून सैनिकांच्या मागण्या पुर्ण होत नाहीत, यातून सरकार सैनिकांच्या मागण्यांमध्ये गंर्भीता दाखवित नाही, सैनिकांच्या मागण्या तात्काळ पुर्ण केल्या नाहीत तर आम्ही पुर्ण संसदेला घेराव घालू, यामुळे तणावपुर्ण स्थिती उत्पन्न झाली तर यालाही सर्वस्वी केंद्र सरकारच जबाबदार राहिल, त्यामुळे सैनिकांच्या सर्व मागण्या तात्काळ पुर्ण कराव्यात, अशी मागणी बीडच्या माजी सैनिक संघटनेच्या वतीने विद्या सानप, खोटे, बळीराम राख आणि तालुक्याच्या सर्व संघटनेने केली आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी दिपा मुधोळ यांच्यामार्फत राष्ट्रपती, पंतप्रधान आणि रक्षा मंत्र्यांना लेखी निवेदन पाठविले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!