Uncategorized

शंभर कोटींच्या घोटाळ्यात मुंगीच्या कारखान्यावर ईडी, सीबीआयची छापेमारी,खोटे दस्ताऐवज तयार करून केला कोट्यावधींचा फ्रॉड, साडे आठशे शेतकर्‍यांनाही शेअर्सच्या माध्यमातून लावला चुना, कारखान्याची पाहणी करून ईडी, सीबीआयने सर्व कागदपत्र केली जप्त, पुढार्‍यांनी माझ्या कारखान्यासह शेतकर्‍यांचे वाटोळे केले, तक्रारदार पांडूरंग सोळंके पत्रकार परिषदेत ढसढसा रडले


बीड, दि. 30 (लोकाशा न्यूज) : देशात गाजलेल्या पीएनबी (पंजाब नॅशनल बँक) घोटाळ्याची धागेदोरे बीडपर्यंत पोहचले असून याच संदर्भाने ईडी आणि सीबीआयने बुधवारी रात्री आणि गुरुवारी बीड जिल्ह्यातील मुंगी (ता. धारूर ) येथील शिवपार्वती साखर कारखान्यावर छापेमारी केली आहे. या कारखान्याच्या माध्यमातून जवळपास खोट्या कागदपत्राच्या आधारे जवळपास शंभर कोटींचा फ्रॉड करण्यात आला असल्याचे समोर येत आहे. यामुळेच सीबीआयने कारखान्याची पाहणी करून यासंदर्भातील सर्व कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या छापेमारीमुळे जिल्ह्यात मात्र मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान बुधवारी सायंकाळी तक्रारदार पांडूरंग सोळंके यांनी बीडमधील शासकिय निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली, हा सगळा फ्रॉड नंदकुमार तासगावकर यांनी केलेला आहे. पुढे पुढार्‍यांनी माझ्या या कारखान्याचे आणि शेतकर्‍यांचे वाटोळे केले. कारण जवळपास साडे आठशे शेतकर्‍यांकडून शेअर्सची रक्कम घेवून ती स्वत:च्या फायद्यासाठी वापरत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
बीड जिल्ह्यातील एका साखर कारखान्यावर सीबीआयची छापेमारी सुरु असल्याच्या वृत्ताने जिल्ह्यात खळबळ माजली होती. तो कारखाना कोणता आणि छापेमारीचे कारण काय यावरून वेगवेगळे तर्कवितर्क लावणे सुरु असतानाच आता या छापेमारीचे मूळ पीएनबी घोटाळ्यात असल्याचे समोर आले आहे. पीएनबी घोटाळ्यात दाखल गुन्ह्याचा तपास सध्या सीबीआय करीत आहे. पंजाब नॅशनल बँकेने बीड जिल्ह्यातील मुंगी (ता.धारूर) येथील शिवपार्वती साखर कारखान्याला 100 कोटी रूपयांचे कर्ज दिले होते. पुरेसे तारण नसतानाही सदर कर्ज देण्यात आल्याचा आरोप असून त्याचअनुषंगाने सीबीआयने बुधवारी आणि गुरुवारी कारखाना साईटवर छापेमारी करून सर्व कागदपत्र जप्त केली आहेत. वास्तविकत: या कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष पांडूरंग सोळंके यांनी 31 ऑक्टोबर 2022 रोजी तक्रार दिलेली आहे. 2 फेब्रवारी 2008 रोजी भारत सरकारच्या ग्राहक संरक्षण मंत्रालय आणि पी. डी. डॉयरेक्टर ऑफ शुगर, कृषी भवनने नियमानुसार साखर कारखाना उभारण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार पांडूरंग सोळंके यांनी मुंगी (ता. धारूर जि. बीड) शिवारातील 39 एकर जमिन कारखाना उभारण्यासाठी खरेदी केलेली होती व ती मुख्य प्रवर्तक पांडूरंग सोळंके यांचे नावे असून ताब्यात आहे. तसेच त्यांच्या नावावर 15 एकर म्हणजेच 6 हेक्टर 12 आर अशी एकूण 53 एकर जमिन कारखान्याच्या नावावर करून त्याची नोंद सातबार्‍यावरती घेतलेली आहे.त्यांनी राज्याचे माजी ऊर्जामंत्री जयदत्त क्षीरसागर, माजलगांवचे माजी आमदार चिरंजीव जगताप, बीडचे माजी आ. सय्यद सलीम व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कारखान्याचे भूमिभुजन केले व त्यांनी आपल्या सभासदाकडू व संचालकाकडून संबंधित कारखान्याचे सिविल वर्क्स व इतर 60 टक्के काम पुर्ण केले होते. दुष्काळच आर्थीक अडचणीमुळे दि. 16 ऑक्टोबर 2010 रोजी मेमोरेन्डम ऑफ अंडरस्टॅण्डींग मुंबई येथे डॉ. नंदकुमार यादवराव तासगांवकर यांच्यासोबत 100 रुपयांच्या बॉन्ड पेपरवर नोटरी डॉ. एस. सी. श्रीवास्तव यांच्यासमोर केले होते. त्यावर फक्त तक्रारदारच मेसर्स तासगांवकर इंडस्ट्रिज प्रा.लि. मार्फत डॉ. एन. वाय. तासगांवकर व साक्षीदार म्हणून अनिल सोळंके व जि. एस. जमादार, कोथरूड पुणे यांच्या साक्षीदार म्हणून सह्या घेतल्या होत्या. पुर्ण मॅटर इंग्रजी भाषेत केले होते. नंदुकमार तासगांवकर यांनी आपल्याच ऑफीसचे क्लर्क श्री. बद्रे आलम इलतिजा हुसेन यांना एमडी असे भासवून त्यांनी 100 रुपयांच्या विना नोंदणीकृत दस्ताऐवजाने पंजाब आणि सिंध बँक, मस्जिद बंदर, मुंबई यांच्याकडे कर्ज मागणी प्रस्ताव दाखल करून पंजाब नॅशनलच सिंध बँक यांच्याकडून 100 कोटी रुपये कर्जाची मागणी केली. त्यानुसार 100 कोटी कर्ज मंजुर करण्यात आले. 100 कोटी रुपयांपैकी 98 कोटी रूपये आपल्या खात्यात वळवून व ते परस्पर काढून फक्त कारखान्याच्या 41 नावावर 2 कोटी रुपये ठेवण्यात आले. तसेच कारखान्यावर 119 कर्मचार्‍यांची नियुक्ती रेकॉर्डवर दाखवण्यात आली. वेळी पगारही दिलेला नाही. त्याची उपास मारीची वेळ आलेली आहे. तसेच कर्ज प्रस्ताव दाखल करतांना मेमोरंडम ऑफ अंडरस्टॅण्डींगच्या मुळ प्रतीवर खाडाखोड करून तसेच बनावट कागदपत्रे तयार करून कर्ज मंजुर करून घेतले. पांडूरंग सोळंकेंना त्यांनी विना मावेजा दानपत्र दि. 20 ऑक्टोबर 2012 रोजी कर्जप्रस्तावासाठी 15 एकर जमिन शिव-पार्वती साखर कारखाना प्रा.लि. मोरेश्वर नगर (मुंगी) मार्फत श्री. बद्रे आलम इलतिजा हुसेन यांना कारखान्याचे प्रतिनिधी दाखवून तसेच तासगांवकर यंनी आपले प्लॉट सर्वे नंबर 18, हिस्सा नं. 1 ए. डमेजरींग 1-68-0 एचआरपी, सर्वे नं. 18, हिस्सा नं. 1, बी. डमेजरींग 0-80 एचआरपी, सर्वे नं. 19, हिस्सा नं. 2, डमेजरींग 0-92-9 एचआरपी, वावे गांव, (ता. कर्जत जि. रायगड) हे मॉर्टगेज दाखवून सर्व 100 कोटी रुपये इतरत्र गुंतवणक केले. तसेच श्री. जंगम यांनी ऑथोराईज सिग्नेटरी अशी सही करून दि.19 नोव्हेंबर 2013 पासून पावती बुक 00801 ते 00843 सोबतच्या लिस्टप्रमाणे ऊस गाळपास वेळेवर जाईल या उद्देशाने 850 सभासदाकडून जवळ-जवळ 85 लाख रुपये वसूल केले. मात्र सदरील रक्कम कारखान्याच्या खात्यात आजतागायत जमा केलेली नाही. सोबत पावती बुकाच्या झेरॉक्स प्रती जोडलेल्या आहेत. सहा वर्षांपासून पैसे भरूनही उसाचे नुकसान झाले आहे. त्यांचे नुकसान भरपाई मिळावी असे शेतकरी तक्रार करत आहेत. तक्रारदारास जेंव्हा कर्ज देणार्‍या बँकांच्या डिसारटी कोर्टातील सर्फेसी अ‍ॅक्टनुसार दि. 14 जुलै 2015 च्या 106,65,92,524 /- रुपये नोटीस आल्या. तसेच सर्फेसी अ‍ॅक्ट च्या 14-2 च्या कलमानुसार मा. जिल्हाधिकार्‍यांनी 17 फेब्रुवारी 2016 रोजी पारीत केलेले आदेश व त्यानुसार मंडळ निरीक्षकांनी प्रत्यक्ष कारखान्याचा ताबा घेण्यासाठी नोटीस बजावल्या होत्या. शासनाने कमी स्टॅम्प भरून 17,50,000/- दस्ताऐवज गहाणखत करीत असतांना शासनाची फसवणूक केली आहे. ही बाब दि. 1 फेब्रुवारी 2018 ची फ कंट्रोल कंट्रोलिंग रिव्हन्यु अँथारीटी महाराष्ट्र पुणे यांची नोटीस आल्यावर समजले. तक्रारदारांनी व शेअर्स होल्डर्स यांनी दिवाणी न्यायालयात जावून कोर्टाकडून बँक व इतरांवर मनाई हुकूम घेतला व तो आजही कायम आहे. तसेच कंपनी रजिस्टार्ड यांच्याकडे चौकशी केली असता तिथे फिर्यादीच्या बनावट सह्या करून फिर्यादीच्या व त्यांचे पुतणे नावे भाऊसाहेब सोळंके यंचा राजीनामा घेतल्याचे बनावट कागदपत्र पाहण्यास मिळाले. वास्तव्यास तक्रारदाराने व त्यांचे पुतणे यांनी कुठलाही राजीनामा दिलेला नाही. तसेच श्री. ब्रदे आलम इलतिजा हुसेन, तासगांवकरव त्यांचे इतर संचालकांना कुठलेच अधिकार दिले नसतांना शिव-पार्वती साखर कारखाना प्रा.नि. चे शेअर्स श्री. राजेंद्र जंगम यांच्या सहीने विक्री करून त्यातील 85 लाख रूपये जमा झालेली रक्कम परस्पर विल्हेवाट करून तसेच बँकांकडून घेतलेले कर्ज याची परस्पर विल्हेवाट स्वतःच्या फायद्यासाठी करून इतरत्र गुंतवणूक केलेली आहे. बद्रे आलम इलतिजा हुसेन, डॉ. नंदकुमार तासगांवकर, श्री. वंदना तासगांवकर, राजेंद्र जंगम व पंजाब नॅशनल व सिंध बँक व आंध्र बँक यांचे अधिकारी यांच्याशी संगनमत करून शेअर्स होल्डर तसेच शिव-पार्वती साखर कारखाना प्रा.लि. ची 106 कोटी रुपयांपेक्षा जास्त आर्थीक फसवणूक केलेली असल्याचे पांडूरंग सोळंके यांनी आपल्या तक्रारीत म्हटलेले आहे. दरम्यान अचानक या प्रकरणांमध्ये चौकशीसाठी बुधवारी सकाळी 11 ते 2 दोन वाजण्याच्या दरम्यान ईडी व सीबीआयच्या पथकाने अचानक धाडी मारल्या. बुधवारी कारखान्याचा पंचनामा करून दुसर्‍या दिवशी म्हणजे गुरुवारी या पथकाने पुन्हा कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी भेट दिली यावेळी संबंधित सर्व कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान या धाडीमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

खोट्या सह्या करून तासगावकरांनी
कारखाना स्वत:च्या ताब्यात घेतला
आर्थिक अडचणीत आलेले सोळंके यांनी मुंबई येथील नंदकुमार तासगावकर नामक व्यक्तीबरोबर शंभर रुपयांच्या बॉण्डवर कारखान्यात पार्टनरशिपचा करारनामा केला होता. एवढ्याच कागदावर पांडुरंग सोळंकेंच्या परस्पर नंदकुमार तासगावकर व आशोक तासगावकरांनी पंजाब नॅशनल बँकेचे 60 कोटी, अंध्रा बँक कडून 25 कोटी व पंजाब व सिंध बँक मुंबई बँकेकडून काही असे एकूण शंभर कोटी पेक्षा अधिक कर्ज घेण्यात आले होते. सदरील कर्ज हे नंदकुमार तासगावकर या व्यक्तीने घेण्यात आल्यामुळे कारखान्यावर मोठा बोजा दाखवण्यात येत होता. ही बाब सोळंके यांना माहित नव्हती. सोळंके यांच्या परस्पर कुठेही धनादेशावर स्वाक्षरी न घेता कर्ज घेण्यात आलेले होते, नंदकुमार तासगावकरांनी सोळंके यांची मालकी काढून स्वतःच्या नावावर कारखाना केला होता. बँकेने कर्ज न भरल्यामुळे बँकेने हा कारखाना लिलावात काढला होता. कारखाना परस्पर नावावर करून तो विक्री करण्याच्याही हालचाली सुरू केल्यामुळे पांडुरंग सोळंके यांनी न्यायालयामध्ये यापूर्वीच धाव घेतलेली होती. सदरील प्रकरण न्यायालयात सध्या सुरू आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर धाडसत्र सुरू
झाले
शिवपार्वती साखर कारखान्याची उभारणी पांडुरंग सोळंके यांच्या पुढाकारातून करण्यात आली. यात इतरही काही भागीदार आणि संचालक होते.या कारखान्यासाठी पंजाब नॅशनल बँकेने कर्ज दिले, मात्र नंतरच्या काळात कारखाना सुरु होऊ शकला नाही. त्यामुळे पंजाब नॅशनल बँक आणि कारखान्याच्या संचालकांनी देखील सदर कारखाना विकण्याचे प्रयत्न केले होते. मराठवाड्यातील अनेक राजकीय पक्षांच्या लोकांनी यात इंट्रेस दाखविला होता, मात्र वेगवेगळ्या न्यायालयीन दाव्यांमुळे ही विक्री प्रक्रिया होऊ शकली नव्हती. त्यातच काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने सदर कारखान्याची लिलाव प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश दिले होते. याची पुढील सुनावणी 3 एप्रिल रोजी होणार आहे. दरम्यान हे सारे होत असतानाच पंजाब नॅशनल बँकेवर गुन्हा दाखल होऊन त्याचा तपास सीबीआयकडे गेला आणि त्यातूनच मग ही छापेमारी झाल्याचे समोर येत आहे.

मला वाचवा, पुढार्‍यांकडून माझ्या
जीवीतास धोका – पांडूरंग सोळंके
खोट्या कागदपत्रांच्या आधारे नंदकुमार तासगावकर यांनी शंभर कोटींचा फ्रॉड केलेला आहे, यात माझा काहीही संबंध नाही, माझ्या परस्पर हा कर्जाचा आकडा कारखान्यावर दाखविण्यात येत आहे. शिवाय आता हा कारखाना आपल्याकडे घेण्यासाठी धनंजय मुंडे आणि त्यांच्या बगलबच्चे प्रयत्न करीत आहेत. याअनुषंगानेच मला त्यांच्याकडून सातत्याने धमक्या येत आहेत. त्यामुळे पोलिसांनी मला त्यांच्या धमक्यांपासून माझे संरक्षण करावे अशी मागणी पत्रकार परिषदेमध्ये तक्रारदार पांडूरंग सोळंके यांनी केली आहे.

कारखाना एकाच्या ताब्यात पैसे
उचलले मात्र, दुसर्‍या, तिसर्‍यानेच

सदर कारखाना हा पांडूरंग सोळंके यांच्या ताब्यात आहे, असे असताना या कारखान्याच्या नावावर नंदकुमार तासगावकर यांनी शंभर कोटीमधील जवळपास 98 कोटी उचलून घेतले तर शेअर्सच्या माध्यमातून पुढे तिसर्‍याच व्यक्तींनी शेतकर्‍यांना लाखो रूपयांना चुना लावण्याचे काम केले आहे. सध्या अंबाजोगाईच्या कारखान्यातून सगळा फ्रॉड प्रकार सुरू असल्याचेही यावेळी सोळंके यांनी सांगितले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!