बीड : सर्व समाजामध्ये विभक्त कुटुंब पद्धत सुरू झाल्यामुळे मुलांच्या विवाह साठी विविध समस्यांचा पालकांना सामना करावा लागत आहे. या सर्व बाबींच्या अनुषंगाने मराठा समाजाने आज बीड मध्ये वधू वर सूचक मेळाव्याचे आयोजन केले होते. आज (ता. २६) सकाळी नारायणगडचे महंत शिवाजी महाराज व मेंगडे महाराज यांच्या शुभहस्ते या मेळाव्याचे उद्घाटन झाले. या वधू वर सूचक मेळाव्यामध्ये 988 मुलं व मुली सहभागी झाले होते. या मेळाव्यासाठी मराठा समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठा पुढाकार घेऊन हा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याच्या माध्यमातून अनेक मुलांना लग्नकार्यासाठी मोठी मदत मिळणार आहे. यात विशेष म्हणजे दोन लाख पगार असणार्या मुलाला सुद्धा मुलगी मिळत नसल्यामुळे अनेक समस्या आल्या होत्या. यासह इतर मुलांना सुद्धा अनेक अडचणी येत होत्या परंतु या मेळाव्याचा अनेकांना फायदा होणार हे माञ निश्चित.
दिवसेंदिवस विभक्त कुटुंब पद्धत आपल्याकडे अवलंबली जात आहे. यामुळेच अनेक परिवारांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत असल्यामुळे व सर्वांशी सुसंवाद असल्यामुळे मुलांची व मुलींची लग्न वेळेत होत होती. परंतु सध्याची विभक्त कुटुंब पद्धत व असलेला अल्प सुसंवाद यामुळे मुलांची लग्न वेळेवर होत नसल्यामुळे अनेक कुटुंबांना मुलांच्या व मुलींच्या लग्नासाठी विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे हे मात्र सर्व समाजाचे दुर्भाग्य आहे. या सर्व अडचणीच्या अनुषंगाने मराठा समाजातील मराठा समाजाने आज बीड शहरातील आशीर्वाद लॉन्स या ठिकाणी मराठा वधू वर सूचक मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्याला पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या वधुवर सुचक मेळाव्यामध्ये 988 मुला मुलींनी सहभाग घेतला होता. हा मेळावा पार पडावा यासाठी मराठा समाजातील अनेकांनी हातभार लावल्यामुळे हा देखणा सोहळा बीड शहरांमध्ये पार पडला. या सोहळ्यासाठी सहकार्य लाभले ते विनोद पिंगळे, साई छत्र ग्रुप, विजयकुमार, भारतजी झांबरे, श्री आनंदजी, नवनाथ शिराळे यासह हरिदास जोगदंड यांनी त्यांचे मंगल कार्यालय समाजासाठी फ्री देऊन सुद्धा विशेष सहकार्य केले. यासह संतोषराव गोरे, मुकुंद चव्हाण, विठ्ठल जोगदंड, मच्छिंद्र कुटे यांनी सुद्धा या सोहळ्यासाठी विशेष सहकार्य केले.
हा सोहळा पार पडावा यासाठी यांचा सहभाग मोलाचा वाटा
बीडमध्ये आयोजित मराठा वधू वर सूचक मेळाव्यासाठी समन्वयक म्हणून श्री ढवळे, श्री तुपे, श्री खांडे, सत्येंद्र पाटील, सौभाग्यवती कबाडे मॅडम, सौभाग्यवती सीता भुसारै, श्री चव्हाण, श्री डावकर, श्री धर्मराज, श्री शेळके, श्री काकडे, श्री चाळक, श्री दास, श्री बेंद्रे, श्री सावंत, श्रीरतन, श्री चव्हाण, श्री किरण सावंत, धनंजय शेंडगे, श्री पवळ, श्री वळेकर, श्री विधाते, श्री सावंत, श्री देवकर, श्री राजू, सौभाग्यवती काटे, सौभाग्यवती मुळे, सौभाग्यवती मस्के, सौभाग्यवती माने यांनी या सोहळ्यासाठी समन्वयक म्हणून विशेष कार्य पार पाडले.
भोजन समिती व समन्वय समिती यांच्यामुळे यशस्वी झाली
आज पार पडलेल्या वधू वर सूचक मेळाव्यामध्ये भोजन समितीमध्ये नितीन धांडे, गजानन शिंदे, संतोष कुडके, संतोष जाधव, संजू आंबेगावकर, विलास सातपुते, विठ्ठल बहिर, प्रशांत मस्के, अशोक गायकवाड यांनी विशेष सहकार्य केले. समन्वय समितीमध्ये शिवाजीराव निकम, प्रकाश पाटील, अनिल भुमरे, सुनील अनभुले, रवींद्र भुसारे, श्री निर्मळ, अशोक हिंगे, शिवाजीराव जाधव, गोविंदा कदम, सुदामराव चव्हाण, सत्येंद्र पाटील यांची सुद्धा भूमिका मोलाची ठरली.
हा सोहळा यशस्वीरित्या पार पडावा यासाठी आर्थिक मदत करणारे दाते
बीडमध्ये पार पडलेला सूचक वधू वर सोहळा यशस्वीरित्या पार पडावा यासाठी अनेकांनी मदत केली. यामध्ये पाटील सर, सुदामराव चव्हाण, शिवाजीराव जाधव, श्री वळेकर, श्री अशोक शिंदे, बहिर सर, नारायण कुटे, अजय कदम, तुषार कदम, श्री बाळासाहेब, अशोकराव जाधव, आप्पा चौरे, सुहास पाटील, बाळासाहेब कालगुडे, राजाभाऊ पिंगळे, श्री कुटे, सोंडगे मॅडम यांनी आर्थिक सहकार्य करून हा सोहळा पार पाडण्यासाठी मदत केली.
हा सोहळा बीडमध्ये पार पडावा ही संकल्पना यांची
मराठा समाजातील मुला मुलींची लग्न वेळेवर व्हावी या अनुषंगाने बीडमध्ये मराठा वधू वर सूचक मेळावा पार पाडावा ही संकल्पना जेष्ठ नागरिक श्री निकम, सीए बी.बी जाधव, राजाभाऊ गुळभिले, श्री कवठेकर दादा, श्री मारुती तिपाले, गायकवाड सर, बहिर सर या मान्यवरांच्या माध्यमातून पुढे आले व आज हा देखणा सोहळा बीडमध्ये पार पडतो तो याच मान्यवरांमुळे.