Uncategorized

माजलगावमध्ये विवाहितेचा खून, पती, सासू, दिरासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल


माजलगाव-शहरातील फुले नगर येथील विवाहितेला चारित्र्यावर संशय घेऊन जीवे मारून खून केल्याची घटना घडली. या प्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात शनिवारी पती, सासू, दिरासह चार जणांविरुद्ध ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
     बानोबी रफिक शेख हिचा विवाह माजलगाव शहरातील फुले नगर येथील शेख रफिक खलील याच्याशी झालेला होता. रफिक खलील शेख (पती), आरिफा उर्फ लतू खलील शेख (सासू), रईस खलील शेख (दिर), सिमा (नणंद) या संगनमत करून मयत बानोबी हिस चारित्र्यावर संशय घेत असायचे. तसेच तू काळी आहेस. तुला आई नाही, तुझ्या सोबत लग्न करून फसलोत, अशा अनेक कारणाने शिवीगाळ व मारहाण करत. तिला उपाशी पोटी ठेऊन शारीरिक व मानसिक त्रास देत होते. त्यातच दि.६ मार्च २०२३ रोजी बानोबी हिच्यावर आरोपीनी जीवघेणा हल्ला करून जिवे मारले. याप्रकरणी मयत बानोबी हीचा माहेरकडील नातेवाईकांनी संशय व्यक्त केला होता. यावर माजलगाव पोलीसांनी शवविच्छेदन अहवाल येताच त्या अहवालात डोक्याला, डोळ्याला मार असल्याचे समोर आले.त्यानुसार मयत बानोबी हीचा भाऊ सय्यद तारेख अब्दुलमन्नान रा. महमदिया कॉलणी, बीड यांच्या फिर्यादीवरून शनिवारीपती,सासू, दिरासह चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ हे करीत असून पती रफिक शेख यास अटक करण्यात आली आहे.

 

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!