बीड, दि. 19 (लोकाशा न्यूज) : आयपीएस धीरजकुमार यांच्या पथकाने केलेल्या धाडीत बीडमधील कुंटण खाण्याचा पर्दाफाश झाला आहे. यावेळी सहा पीडित महिलांची सुटका करून बीडच्या शिवाजीनगर ठाण्यात दोन आरोपींवर पीटा अॅक्टनुसार कारवाई करण्यात आली आहे.
मागच्या सहा महिण्यांपासून सुंदर ज्ञानोबा भिसे हे शिवाजी नगर ठाण्याच्या हद्दीमध्ये कुंटणखाना चालवित होते. याची माहिती माजलगावचे आयपीएस धीरजकुमार यांना मिळाली होती, त्यानुसार त्यांच्या पथकाने रविवारी रात्री आठ ते साडे आठच्या सुमारास सुंदर भिसे यांच्याकडून एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या कुंटण खान्यावर धाड टाकली. यावेळी पथकाने सहा पीडित महिलांची सुटका करून दोन आरोपींना ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर बीडच्या शिवाजीनगर ठाण्यात पीटा अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, सहाय्यक पोलिस अधीक्षक धीरजकुमार, डीवायएसपी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली बीड ग्रामीणचे पोलिस निरीक्षक संतोष साबळे, एपीआय इधाते, पोलिस नाईक अशोक नामदास, युवराज चव्हाण, कानतोडे, गणेश नवले यांच्यासह बीड ग्रामीण ठाण्याच्या कर्मचार्यांनी केली.