बीड(प्रतिनिधी):- बीड शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून वीज रस्ते नाले पाण्याच्या समस्या होते पण मागील अडीच ते तीन वर्षाच्या कार्यकाळात या समस्यांचे मी पाठपुरावा करून मोठ्या प्रमाणात विकास निधी शहरासाठी आणला आहे. आणि नुकत्याच झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणावर निधी बीड मतदार संघासाठी प्राप्त झाला असून नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी जास्तीचा विलंब न करता तातडीने राज्य शासनाकडे प्रस्ताव दाखल करावे अशा सूचना बीड नगर पालिकेचे मुख्याधिकारी, अधिकारी, कर्मचारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व न.प. चे पाणी पुरवठा विभाग अधिकार यांची आज संयुक्त आढावा बैठक आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिल्या.
याबाबतीत अधिक माहिती अशी की, सन 2023-24 च्या अर्थसंकल्पात नागरीकांसाठी आवश्यक असणाऱ्या वाढत्या वसाहती लक्षात घेता शहरातील रस्त्यांच्या व नाली बाबत निधीची तरतुद न.प. च्या अर्थसंकल्पात करण्याच्या सुचना केल्या. बीड शहरातील नागरिकांना दर पाच ते सहा दिवसाला पाणी पुरवठा करण्यात यावा यासाठी व्यवस्थापन व अमृत पाणी पुरवठा विभागला सांगून तात्काळ उपाययोजना केल्या व पाणी पुरवठा तात्काळ व्यवस्थित करण्यासाठी सुचना दिल्या. तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची उंची वाढवणे व परिसराचे सुशोभिकरण प्रस्ताव शासनाला तात्काळ पाठविण्यात यावा यासाठी सूचना केली. घरकुल मंजुर लाभार्थ्यां बाबतीत मध्ये सविस्तर आढावा घेऊन मंजूर लाभार्थ्यांना तात्काळ धनादेश देण्याच्या सुचना केल्या. शहरातील पार्किंग व्यवस्था होण्यासाठी पशु वैद्यकीय दवाखाना, सुभाष रोडच्या जागे बाबत शासनास 37 A प्रस्ताव गेला आहे त्याचा पाठ पुरवा करणार आहोत. पेठ बीड भागातील बांधण्यात आलेली मच्छि मार्केट इमारत व जुनी भाजी मंडई येथील मटण मार्केट इमारत बाबत निर्णय घेण्याच्या सुचना केल्या. सध्या शहरात सिमेंट रस्त्यांचे व नालीचे कामे सुरु आहेत ते दर्जेदार व काम गतीने करण्याच्या सूचना देखील यावेळी दिल्या. संबंधित अधिकाऱ्यांनी वेळेवर आपले प्रस्ताव राज्य शासनाकडे दाखल करावेत असे आ.संदीप क्षीरसागर या आढावा बैठकीत म्हणाले.