Uncategorized

तरुणाचं संतापजनक कृत्य; अंघोळ करताना मुलीचे चित्रीकरण केले,माजलगाव शहर ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

माजलगाव, दि.५: अंगोळ करताना अल्पवयीन मुलीचे चित्रीकरण केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी एकाविरूध्द माजलगाव शहर पोलीस ठाण्यात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीस तात्काळ अटक केली आहे.

माजलगाव शहरातील पीडित अल्पवयीन मुलगी अंगोळ करत असताना रविवारी सकाळी १०.३० वाजता आरोपी अनिकेत अरुण मोरे यांनी मोबाईल मध्ये चित्रीकरण केले. ही बाब लक्षात येताच पीडितेच्या तक्रारीवरून माजलगाव शहर पोलीस ठाण्यात पोस्को, आय. टी. अक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अनिकेत अरुण मोरे (वय २६ वर्षे) रा.अशोक नगर, माजलगाव यास अटक करण्यात आले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश राठोड हे करत आहेत.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!