Uncategorized

जिल्ह्यातील सर्व पशुंचे बाजार सुरू करण्यास अटींच्या अधीन राहून जिल्हाधिकाऱ्यांनी दिली परवानगी, गोवंशीय पशुधनास लम्पी प्रतिबंधक लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र बाळगणे गरजेचे

जिल्ह्यातील लम्पी स्किन डिसीज या जनावरांमधील संसर्ग रोग नियंत्रणात

बीड | प्रतिनिधी , दि 05 :- बीड जिल्ह्यातील शंभर टक्के गोवंशीय पशुधनास लम्पी चर्मरोग प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले असून सदर प्रादुर्भाव नियंत्रणात असल्याने शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या सक्षम प्राधिकरणाने गोवंशीय पशुधनास लम्पी चर्मरोग प्रतिबंधक लसीकरण केले बाबतचे प्रमाणपत्र संबंधितांनी बाळगण्याचे अटींच्या अधीन राहून जिल्ह्यातील सर्व पशुंचे बाजार सुरू करण्यास परवानगी देण्यात येत आहे असे आदेश अध्यक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिले आहेत.जिल्हाधिकारी यांनी सदर आदेश महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाच्या अधिसूचना 29 नोव्हेंबर 2022 च्या नुसार प्राप्त झालेल्या अधिकाऱ्याने दिले आहेत . यापूर्वी जिल्ह्यात लम्पी स्किन डिसीज या जनावरांमध्ये आढळणाऱ्या संसर्ग रोगाचा फैलाव रोखण्यासाठी जिल्ह्यात कडक निर्बंधांबरोबरच उपाययोजनांवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला होता. यामुळे जनावरांमध्ये या रोगाचे लक्षणे आढळून आल्याने पूर्वी निर्बंध लावण्यात आले होते. लंम्पी स्कीन डिसीज या जनावरांमध्ये आढळणाऱ्या आजारामुळे पशु बाजार बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीविषयक व आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्या मुळे सदर जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय बीड यांच्या वतीने आदेश निर्गमित आले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!