Uncategorized

पंकजाताई मुंडे यांचं माजलगांवमध्ये जोरदार स्वागत, कार्यकर्ते, ग्रामस्थांनी रस्त्यात वाहनाचा ताफा थांबवून केलं स्वागत

माजलगांव ।दिनांक ०३।
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचं आज शहर व ग्रामीण भागात जोरदार स्वागत झालं. विविध गांवच्या ग्रामस्थ आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यात वाहनाचा ताफा थांबवून त्यांचं उत्स्फूर्त स्वागत केलं.

डाॅ. विखे पाटील हाॅस्पीटल आणि विजया अर्बन मल्टिस्टेटच्या वतीने शहरात मोफत आरोग्य शिबीराचं उदघाटन पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आलं होतं. कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी त्या आज शहरात आल्या होत्या. सकाळी परळीहून निघाल्यावर रस्त्यात दिंद्रुड, तेलगांव, नित्रुड, पात्रुड व शहराच्या वेशीवर त्यांचं भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी रस्त्यात वाहनाचा ताफा थांबवून मोठया जल्लोषात जोरदार स्वागत केले.

शहरात आल्यानंतर माजी नगराध्यक्ष अशोकराव होके पाटील यांच्या निवासस्थानी त्यांचे स्वागत झाले. यावेळी माजी आमदार राधाकृष्ण होके, रमेश आडसकर, राजाभाऊ मुंडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, प्रवक्ते राम कुलकर्णी आदी उपस्थित होते.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!