बीड (प्रतिनिधी):- गेल्या अठरा वर्षांपासून बीड शहरामध्ये आ.संदीप क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक शिवजयंती उत्सव साजरा होत असून संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेल्या ही शिवजयंती कुठल्याही प्रकारची वर्गणी न घेता साजरी होते. या अनुषंगाने आज न.प.च्या मुख्याधिकारी सौ.निताताई अंधारे, नेहाताई क्षीरसागर यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर व कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. यावेळी जयश्रीताई वाघमारे, सुजाताताई चव्हाण,अनिताताई वाघमारे, विद्याताई जाधव, शिंदेताई यांच्यासह सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष शाहिनाथ परभणे, प्रा.विजय पवार, नखाते सर, अॅड.दिपक कुलकर्णी, पिंटू पवार, भाऊसाहेब डावकर, सचिन शेळके, बरकत पठाण यांची उपस्थित होती.
सालाबादप्रमाणे यावर्षीही शिवजयंती निमित्त छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून बारामती एग्रीकल्चर डेव्हलपमेंटच्या विश्वस्त/सचिव तथा आ.रोहित पवार यांच्या मातोश्री सौ.सुनंदाताई राजेंद्र पवार या उपस्थित राहणार आहेत. या बरोबरच विदेशी कलाकारासह विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्तृत्ववान महिलांचे ढोल पथक हे असणार आहे. तसेच मुख्याधिकारी सौ.निताताई अंधारे यांना नेहाताई क्षीरसागर यांनी यावर्षी महिला भगिनी, युवती, ज्येष्ठ महिलाांना कार्यक्रमस्थळी बसण्याची विशेष व्यवस्था व सागर हाईटपासून स्काऊट भवन रोड,एचडीएफसी बँकच्या बाजुने महिलांकरीता एक विशेष गेट ठेवण्यात आली असल्याची माहिती दिली. तरी या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन सौ.नेहाताई संदीप क्षीरसागर यांनी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने केले आहे.















