बीड ः प्रतिनिधी
तुम्ही-आम्ही बीडकरच्या वतीने आयोजीत करण्यात आलेल्या सर्वधर्म समभाव शिवजयंतीनिमित्त आज दि.19 रोजी सकाळी 8 वाजता भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या निमित्तची तयारी पूर्ण झाली असून शहर व परिसरातील शिवप्रेमींनी आपल्या राजाला अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण बीड शहर शिवमय झाले आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही तुम्ही-आम्ही बीडकरच्या वतीने सर्वधर्म समभाव शिवजयंती मिरवणूक आयोजीत करण्यात आली आहे. सकाळी 8 वाजता छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुलावरुन मिरवणूकीस प्रारंभ होणार आहे. या मिरवणूकीत विविध शाळांचे विद्यार्थी लेझीमसह विविध कलाप्रकार सादर करण्याबरोबरच ऐतिहासिक देखावेही साकारणार आहेत. यानिमित्त शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन तुम्ही-आम्ही बीडकरच्या वतीने करण्यात आले आहे.
—–















