आज माजलगाव मतदारसंघातील माजलगाव,वडवणी,धारूर तिन्ही ठिकाणी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मा. आ.प्रकाश दादा यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.तेलंगणा सरकार शेतकऱ्यांना 24 तास वीज मोफत देऊन शेतकऱ्यांचा सर्वांगिण विकास कसा करता येईल याची आखणी करत आहे तर दुसरीकडे आपल्या राज्यात शेतकऱ्यांची वीज तोडली जाते हे दुर्दैव आहे.
शेतकऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा,कर्जमाफी,सिंचन क्षमता वाढविणे या गोष्टींचे नियोजन करून शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे.शेतमालावर असलेली निर्यात बंदी उठवली गेली पाहिजे.अशी भावना यावेळी व्यक्त केली.
माजलगाव, वडवणी, धारूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी हे आंदोलन यशस्वी केले.मोठ्या संख्येने पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचे आभार.















