आज शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी माजलगाव येथे वसंतराव नाईक चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.या आंदोलनास शेतकरी,कष्टकरी, कार्यकर्ते,पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि हे आंदोलन यशस्वी केले त्याबद्दल मा.आ.प्रकाश दादा सोळंके यांनी आभार मानले.
हे आंदोलन पुढील मागण्यांसाठी करण्यात आले होते.
- शेतकन्यांच्या सोयाबीन पिकास प्रति क्विटल 10 हजार रू. भाव देवुन खरेदी करावी.
2.शेतकन्यांच्या कापुस पिकास प्रति क्विंटल 12 हजार रू भाव देवुन खरेदी करावा. - शेतकऱ्यांचे शेतीपंपाचे विज कनेक्शन तोडण्यात येऊ नये.
- शेतकऱ्यांचे बँक खाते होल्ड केलेले सुरू करावीत.
5.अतिवृष्टीचे व सततच्या पावसाने झालेल्या पिकाचे नुकसान बाबत शेतकऱ्यांचे अनुदान
त्वरीत बँक खात्यात जमा करावीत.
- शेतकऱ्यांचे प्रोत्साहन अनुदान 50 हजार रू. बँक खात्यात जमा करावीत.
- शेतकऱ्यांची दोन लाखाच्या पुढील थकीत रक्कमेची कर्ज माफी देण्यात यावी.
8.एपीएल कार्ड धारक शेतकऱ्यांचे बंद केलेली धान्य पुर्वरत सुरू करणे.
शेतकऱ्यांच्या मालाचा भाव पडत नाही तर तो पाडला जातो ही शोकांतिका आहे.जर निर्यात बंदी उठवली तर शेतकऱ्यांच्या मालाला नक्कीच भाव मिळेल ही भावना यावेळी व्यक्त केली.आज शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम केले जात आहे.असे प्रकार घडत राहिले तर महावितरणच्या कर्मचाऱ्यांना गाव बंदी केलं जाईल असा ईशारा यावेळी दिला.
या आंदोलनासमयी आ.प्रकाश सोळंके यांनी तेलंगणा राज्यातील के.सी.आर सरकारचा उल्लेख करत त्यांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक केले.अवघ्या आठ वर्षात या सरकारने बळीराजाला सर्वोच्च स्थानावर नेऊन ठेवले.सिंचन क्षमता वाढविणे,भात खरेदीत निरंतर वाढ,24 तास ऊर्जा पुरवठा, भूजलपातळीत वाढ,कृषी उत्पादनांसाठी साठवण आणि सर्वात महत्वाचे म्हणजे 21557 कोटींची कर्जमाफी करत ३९.२६ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला.
पुढील काळात शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेतली गेली नाही.तर,हे आंदोलन अधिक तीव्र करून ठिकठिकाणी चक्का जाम केले जाईल.















