पुणे, 15 फेब्रुवारी : पुण्यात आयकर विभागाने जवळपास आठ ठिकाणी छापेमारी केली आहे. पुण्यातील बडे उद्योजक असलेले सिटी ग्रुपचे चेअरमन आणि अमनोरा पार्कचे सर्वेसर्वा अनिरुद्ध देशपांडे यांच्या घर आणि कार्यालयावर छापा टाकला आहे. अनिरुद्ध देशपांडे यांच्यावरही छापेमारी ते पुण्यातील मोठे बांधकाम व्यवसायिक आहेत तसंच ते शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.
पुण्यात आज आयकर विभागाने 8 ठिकाणी छापे टाकले आहे. सिटी ग्रुपचे चेअरमन आणि अमनोरा पार्कचे सर्वेसर्वा अनिरुद्ध देशपांडे यांच्यावर बुधवारी सकाळी प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली. त्यांच्या घर आणि कार्यालयाची झाडाझडती भल्या पहाटेपासूनच सुरू करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.















