Uncategorized

योगेश पर्वात शिवप्रेमींना घडणार ‘भक्ती अन् शक्तीचे दर्शन ! छत्रपतींच्या जयंतीनिमित्त शिवाजी महाराजांच्या कार्यप्रणालीवर आधारित लेझर शो, लाईट शो चे केले आयोजन, सिने जगतातील सेलिब्रिटीही येणार, परिवारासह जयंती उत्सव सोहळ्यात सहभागी व्हा – डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर


बीड, दि.12 (लोकाशा न्यूज) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त नियोजन पूर्व बैठक डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. याप्रसंगी शिवजयंती नियोजन पूर्व बैठकीत विविध सामाजिक, सांस्कृतिक, प्रबोधनात्मक उपक्रमाविषयी चर्चा झाली.
यावेळी डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर मार्गदर्शन करताना म्हणाले की, गेल्यावर्षी प्रथमच शिवजयंती निमित्त कार्यक्रम आयोजित केले होते. मात्र त्यावेळी शिवप्रेमींचा प्रतिसाद पाहता यावर्षी भव्य प्रमाणात आणि दिमाखात जयंती सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. मागच्या जयंतीचा अनुभव पाहता दक्षता घेऊनच सर्व कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यप्रणाली वर आधारित लेझर शो, लाईट शो चे आयोजन करण्यात येणार आहे. कल्पतरू चित्र- शिल्प महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवप्रेमींसाठी 17 व 18 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 07 वाजेपर्यंत हा महोत्सव सुरू राहील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी सर्वांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून यावेत. सकाळी महाराष्ट्राचे राज्यगीत गायनाचे आयोजन केले असल्याचे सांगितले. शिव जयंतीनिमित्त येणार्‍या सर्व शिवप्रेमींना भगवे फेटे बांधून पुतळ्याच्या परिसरात मिरवणूक काढण्यात येणार आहे. यावेळी पारंपरिक ढोल ताशे, तुतारींच्या गगनभेदी गर्जनाचे देखील यावेळी आयोजन करण्यात येणार आहे. यावेळी देखील शिवप्रेमींसाठी भक्ती आणि शक्ती चा संगम सेल्फी पॉइंट पहावयास मिळेल. या उत्सव सोहळ्यातील मुख्य आकर्षण सिने जगतातील सेलिब्रिटी रहाणार आहे. महिला भगिनींना पुरेशी बैठक व्यवस्था करण्यात येईल. सर्वांना सुरक्षित वाटेल असे कार्यक्रम आयोजित करू असे संगितले. आपल्या वतीने वर्षभरात विविध कार्यक्रम घेतो. केवळ राजकारण न करता सामाजिक, सांस्कृतिक,शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रात, महापुरुषांच्या जयंत्या साजर्‍या करत असतो. समाजाला काही तरी देणे लागतो या भावनेतून करू करत असतो. शीवजयंती उत्सव सोहळ्यात शहरातील आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी परिवारासह सहभागी होऊन कार्यक्रमाचा आनंद घेण्याचे आवाहन डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांनी केले. याप्रसंगी उपस्थितांकडून शिवजयंती उत्सव सोहळ्यानिमित्त सूचना आणि मत जाणून घेतले. याबैठकीसाठी सर्व नगरसेवक, कार्यकर्ते आणि शहरातील आणि ग्रामीण भागातील शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!