Uncategorized

जिल्ह्यातील विविध प्रश्न खा. प्रितमताईंनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडले,
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वार्षिक नियोजनात परळी -बीड मार्गाच्या चौपदरीकरणाचा समावेश करावा, बीड, अंबाजोगाईतील प्रश्न सोडवून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे रखडलेले अनुदानही तातडीने देण्याची केली मागणी


बीड, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याद्वारे परवा आयोजित संसद सदस्यांच्या बैठकीत खासदार प्रीतम ताई मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील विविध प्रश्न मांडले.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वार्षिक नियोजनात परळी -बीड मार्गाच्या चौपदरीकरणाचा समावेश करण्यात यावा ही प्रमुख मागणी मा. मुख्यमंत्र्यांकडे केली. या मार्गाचे महत्व आणि मार्गावरील वाहतूक बघता सिरसाळा ते तेलगाव आणि जरूड फाटा ते तेलगाव हा रस्ता चौपदरी करण्याचा खासदार मुंडे यांचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने त्या सातत्याने पाठपुरावा करत आहेत.

तसेच बीड शहरातील शिवाजी चौक ते बार्शी नाका हा रस्त्या चौपदरी व सिमेंट काँक्रिटचा करणे व बिंदुसरा नदीवरील पुलाचे रुंदीकरण करणे या मागण्या देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केल्या. वार्षिक नियोजन २०२२-२३ मध्ये सदरील रस्त्यांच्या कामांचा समावेश करून त्याला मंजुरी देण्यात यावी व याकामी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा या खासदार मुंडे यांच्या मागणीला मा. मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

तसेच गोगलगाय व तत्सम कीड प्रादुर्भाव, अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची उर्वरित रक्कम देण्याबाबत सूचना करण्याची मागणी ही याप्रसंगी केली. आपल्या जिल्ह्यातील एकमेव ग्रामीण वैद्यकीय रुग्णालय असलेल्या स्वा. रा.ती वैद्यकीय महाविद्यालयाच्या पदभरती संदर्भात संबंधित विभागांना सूचित करून पदभरती करण्याची ही मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!