Uncategorized

परळीत भल्या पहाटे साखरेच्या ट्रकवर सशस्त्र दरोडा ;
अवघ्या बारा तासात शहर पोलिसांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळीत केले जेरबंद

परळी वैजनाथ दि २९ (लोकाशा न्युज) :- मंगळवेढा जिल्हा सोलापूर येथून वर्धा जिल्ह्यातील आर्ची व कारंजा या ठिकाणी साखर भरून परळी मार्गे जाणाऱ्या ट्रकवर परळी शहरात भल्या पहाटे चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकून साखर लांबवली. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येऊन पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीमने अवघ्या बारा तासातच चोरट्यांच्या मुसक्या आवळीत जेरबंद केले. पोलिसांनी चोरट्यांनी वापरलेले शस्त्र आणि तीन मोटरसायकली हस्तगत केल्या असून लांबवण्यात आलेल्या साखरेचा तपास सुरू आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज २९/०१/२०२४ रोजी सतीष रामभाऊ धंदर वय ३९ वर्ष हे व्यवसाय ड्रायव्हर रा. गाडगे नगर शेगाव परीसर अमरावती येथील असून ते अमरावती मधील डेक्कन ट्रान्सपोर्टटेशन येथे ड्रायव्हर म्हणून काम करीत असून ट्रक नं. एम एच-२७-बीएक्स-७२१३ या १६ टायर ट्रकवर ड्रायव्हर म्हणुन नोकरीस आहे. ह्या ट्रकवर ते स्वतः आणि अशफाक हुसेन अलताफ हुसेन असे ड्रायव्हर असुन शेख साजीद शेख मोहम्मद हा क्लीनर म्हणुन कामास आहे. दिनांक २८/०१/२०२३ रोजी दुपारी साडे तीन वाजण्याचे सुमारास औताडे साखर कारखाणा मंगळवेढा जि. सोलापुर येथुन तीस टन साखर भरुन घेवुन वर्धा जिल्हा मधील आर्ची व कारंजा येथे सदर साखरची डीलीव्हरी देण्यासाठी ड्रायव्हर अशफाक हुसेन व क्लीनर शेख साजीद असे सोलापुर, लातुर, परळी अशा मार्गे निघाले. यावेळी सतीष धंदर स्वतः ट्रक चालवीत होते व दुसरा ड्रायव्हर अशफाक हुसेन व क्लीनर शेख साजेद हे दोघे झोपलेले होते. हा ट्रक घेऊन ते पहाटे साडे तीन वाजण्याचे सुमारास परळी येथे पोहचलो. परळी येथिल पहील्या चौकातुन ट्रकच्या मागे तीन मोटार सायकल वरून सहा चोरट्यांनी सशस्त्र ट्रकचा पाठलाग करीत हाॅर्न वाजवुन ट्रक थांबवीण्याचा इशारा करीत होते. त्यावेळेस चालकाने ट्रक निर्जन ठिकाणीन थांबवता पुढे परळी बसस्थानकच्या समोर चहाचे ठेप्यावर थांबवीला व खाली उतरुन चहा पीण्यासाठी चहाचे ठेल्यावर गेले. तेवढयात पाठलाग करणारे मोटार सायकल वर सहा दरोडेखोर अंदाजे तेथे आले त्यांनी ट्रककडे पाहुन ड्रायव्हर कोण आहे असे विचारु लागले. परंतु चालक सतिष धंदर यांनी चहाचे ठेप्यावर कांहीच उत्तर दिले नाही मात्र ट्रक मध्ये बसत असतांना त्यापैकी एक इसमाने धंदर यांना चाकु दाखवुन मी परळी चा शहर अध्यक्ष आहे. वीस हजार रुपये दे नाहीतर तुझी गाडी जावु देत नाही असे म्हणुन ट्रक चालकाला धमकी दिली. त्यावेळी त्यांनी माझ्या जवळ पैसे नाहीत असे सांगितले असता त्यांच्या पैकी एकजण ट्रक मध्ये चढला व अशफाक हुसेन, शेख साजीद यांना उठवुन त्यांना देखील हातातील दाखवुन पैश्याची मागणी केली व ट्रकचे कबीन मध्ये कोठे पैसे आहेत का शोधु लागले आरोपी मराठी भाषेतच बोलत होते. त्यानंतर चाकु त्यांना ट्रक मध्ये काही मिळाले नसल्याने ट्रक मधील दोघांना खाली उतरवले व त्यांना ट्रक मध्ये काय माल आहे असे विचारता त्यांनी साखर असल्याचे सांगीतले तेव्हा त्यांनी आम्हाला साखरेचे पोते द्या नाहीतर चाकुने खुपसुन टाकु अशी धमकी देऊ लागले. एवढेच नाही तर दरोडेखोरांनी गाडीची रस्सी चाकुने कापुन ट्रक मधील साखरेचे कट्टे काढले व तीन मोटार सायकलवर लादुन घेवुन गेले व एक जन तेथेच ट्रक चालकांना चाकु लावुन थांबला. तेथे उभे असलेले लोकांना ट्रक चालकांनी मदत करण्यासाठी विनवणी केली परंतु घाबरुन त्यांना कोणीही मदत करत नव्हते. यावेळी साखर घेऊन गेलेले मौटार सायकल वरील लोक परत येवुन आनखी साखरेचे कट्टे मोटार सायकल वर लादुन घेवुन गेले. त्यांनी अशी एकुण १२ कट्टे घेवुन गेले. ते सर्व निघुन गेल्यानंतर चालकांनी मालकास फोन करुन घटने बाबत कळवीले व शेख अशफाक याने डायल ११२ वर काॅल केला व ऑटो मधून त्यांनी सरळ शहर पोलीस स्टेशन घाटून झाल्या घटनेची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी, डीबी शाखेचे भास्कर केंद्रे, गोविंद भताने, गोविंद ऐलमोटे, श्रीकांत राठोड, सिद्धांत गोरे आदींना शोध मोहिमेवर पाठविले. ह्या टीमने अत्यंत शिताफीने गुन्हा उघड करीत गुन्ह्यातील दरोडेखोर सुमित उर्फ बंटी दशरथ जाधव वय २४ भगवान बाबा चौक परळी, बालाजी अंकुश दहिफळे वय २३ राहणार जुने कोर्ट शेजारी हमालवाडी परळी, वैभव दशरथ कापसे वय २२ राहणार पद्मावती गल्ली परळी, नागेश अशोक शिंदे वय २१ राहणार माणिक नगर परळी व दोघे बाल दरोडेखोर अशा सहा जणांच्या अवघ्या बारा तासातच मुसक्या आवळीत जेरबंद केले. पोलिसांनी दरोडेखोरांकडून घटनेत वापरलेली शस्त्र हत्यार व तीन मोटरसायकली जप्त केल्या आहेत मात्र लांबवलेली साखर हस्तगत करणे बाकी आहे पोलीस त्याचा शोध घेत आहेत अशी माहिती परळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांनी दिली.
दरम्यान अवघ्या काही तासातच शस्त्रासह दरोडेखोरांच्या मुसक्या आवळीत जेरबंद केल्याबद्दल पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी, डीबी शाखेचे भास्कर केंद्रे, गोविंद भताने, गोविंद ऐलमोटे, श्रीकांत राठोड, सिद्धांत गोरे आदींचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!