ओपन स्पेस हद्दीतली अतिक्रमणे दूर करावीत,राष्ट्रीय महामार्ग 548-सी पॅकेज माजलगाव ते परतूर रस्त्याचे अपूर्ण खराब काम,राष्ट्रीय महामार्ग-61 मधील बायपासचे अपूर्ण काम,राष्ट्रीय महामार्ग 548-सी पॅकेज माजलगाव ते केज मधील खराब रस्ता व धारूर घाट कटिंग बाबत उपविभागीय अधिकारी कार्यालय माजलगाव येथे बैठक घेण्यात आली.
माजलगाव नगरपरिषद हद्दीतील ओपन स्पेस वरील अतिक्रमणे तातडीने दूर करण्याबाबत उपविभागीय अधिकारी यांच्याशी चर्चा मागील काही दिवसांपूर्वी झाली होती.परंतु, ही अतिक्रमणे दूर करण्याबाबत मुख्याधिकारी न.प माजलगाव यांनी कुठलीही कार्यवाही केलेली दिसून येत नाही.याबाबत उपोषणाचा इशारा देण्यात आला होता.याबाबत कारवाई करण्याच्या दृष्टीने आजची बैठक बोलावली होती.टाईम बॉण्ड प्रोग्रॅम तयार करून हे प्रकरण निकाली काढण्याचे लेखी पत्र दिल्यामुळे उपोषण करण्याचे तूर्तास पुढे ढकलले आहे.मात्र,कुठलीही प्रक्रिया न दिसल्यास कार्यकर्त्यांसह उपोषण करून आंदोलन केले जाईल.
माजलगाव शहरातील रस्त्याच्या बाजूच्या नाल्यांचे अपूर्ण काम, माजलगाव ते परतूर रस्ता,माजलगाव ते केज रस्ता या दोन्ही रस्त्यांची कामे अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेले असून बऱ्याच ठिकाणी रस्त्याचे काम हे अपूर्ण असल्याच्या वारंवार तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.रस्त्यावर काही ठिकाणी भेगा पडल्याने अपघाताचे प्रमाण वाढत आहेत,लोकांच्या जीवाशी न खेळता तातडीने कामे पूर्ण केले जावे अन्यथा या मागणीसाठी देखील उपविभागीय कार्यालयासमोर उपोषण करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग-61 मधील बायपासचे काम मागील अनेक वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे.याबाबत वेळोवेळी कार्यकारी अभियंता व अधीक्षक अभियंता(राष्ट्रीय महामार्ग मंडळ कार्यालय,औरंगाबाद) यांच्याशी चर्चा केलेली आहे.परंतु अद्यापपर्यंत सदर रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत आहे.
धारूर शहराच्या घाट कटींगचे काम न केल्यामुळे अनेक निष्पाप लोकांचा मृत्यू झालेला आहे.यास सर्वस्वी राष्ट्रीय महामार्गाचा विभाग जबाबदार असल्याचे निदर्शनास आणुन दिले.
वरील,सर्व विषयांवर तातडीने कारवाई करत लेखी स्वरूपात टाईम बॉण्ड प्रोग्राम सादर करण्याची सूचना या बैठकीत केली.















