Uncategorized

चिमुकल्यांच्या कलागुणांना वाव देवून डॉ. सारिकाताईंनी जिंकली विद्यार्थ्यांची मने, राजमाता जिजाऊ जन्मोत्सव निमित्त आयोजित केलेल्या स्पर्धेचे डॉ. दिपाताईंच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले बक्षीस वितरण, चित्रकला स्पर्धेत 218 तर वेशभूषा स्पर्धेत 77 जणांनी घेतला होता सहभाग


बीड, दि.23 (लोकाशा न्यूज) : राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांनी ‘आम्ही लेकी जिजाऊच्या’ वेशभूषा स्पर्धा आणि चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचे बक्षीस वितरण माजी नगराध्यक्षा तथा सौ.के. एस. के. महाविद्यालयाच्या माजी प्राचार्या डॉ.दीपाताई क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये वेशभूषा स्पर्धा मोठा गट 05 ते 12 वर्ष आणि छोटा गट 13 ते 20 वर्षांखालील मुलींसाठी तर चित्रकला स्पर्धा ही शालेय बाल गट, शालेय माध्यमिक गट व महाविद्यालयीन गटातील विद्यार्थ्यांसाठी होती. चित्रकलेसाठी गडकिल्ले हा विषय देण्यात आला होता तर वेशभूषेसाठी आम्ही लेकी जिजाऊच्या वेशभूषा हा विषय होता. स्पर्धेतील विजेत्यांना मानाचा फेटा, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. सदरील स्पर्धेत चित्रकलेसाठी 218 स्पर्धकांनी तर वेशभूषा स्पर्धेत 77 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला.या बक्षिस वितरण समारंभ प्रसंगी सौ. के.एस.के. महाविद्यालयाचे उपप्राचार्य संजय पाटील, रविराज जेधे,अनिता शिंदे यांच्यासह स्पर्धक व त्यांच्या परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना डॉ. दीपाताई क्षीरसागर म्हणाल्या की,कल्पतरू संस्थेच्या वतीने अत्यंत चांगली संकल्पना राबवली जात आहे. विद्यार्थांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने डॉ. सारिकाताई क्षीरसागर ने कल्पतरू संस्थेच्या माध्यमातून राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सव दिनानिमित्त या स्पर्धा आयोजित करण्याचे ठरविले. यामुळे विद्यार्थ्यांना राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि गडकिल्ल्यांचे महत्व कळेल तसेच वेशभूषा स्पर्धेमुळे जिजाऊंच्या काळातील वेशभूषा करून महिलांमध्ये नवीन उत्साह येईल आणि नवीन काही करता येईल. आणि आज आपण बघत आहात या स्पर्धेला किती मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. कला ही जीवनात खूप महत्वाची आहे.आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास झाला पाहिजे. स्पर्धा ही केवळ नावाला असते. आत्मविश्वास वाढावा यासाठी स्पर्धेत भाग घेतला पाहिजे. आपल्या पाल्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा. स्पर्धेचे युग असल्याने मुलांवर अभ्यासाचा ताण पडतो.त्या ताण तणावातून त्यांना मुक्त होण्यासाठी कलेचा छंद जोपासायला हवा. मुलांना त्यांच्या आवडीचे खेळ खेळू द्यावेत, त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधला पाहिजे,शाळेतील विषयांवर चर्चा केली पाहिजे, मुलांना विश्वासात घेऊन मित्र – मैत्रिणीसारखे वागा, त्यांच्या समस्या जाणून घ्या त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका असे आवाहन केले.तसेच ज्या स्पर्धकांना आजच्या स्पर्धेत बक्षिस मिळाले नाही अशा स्पर्धकांनी खचून न जाता पुन्हा जोमाने तयारी करावी आणि यश संपादन करावे असे डॉ.दीपाताई क्षीरसागर यांनी सांगितले. चित्रकला शालेय शालेय बालगट स्पर्धेत आर्या बाप्पासाहेब जोगदंड प्रथम, विक्रांत मोराळे द्वितीय, आराध्या अभिषेक जव्हेरी तृतीय आणि काव्य मेंडसे हिला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. चित्रकला शालेय माध्यमिक गट स्पर्धेत गायत्री सुजित जव्हेरी (प्रथम), श्रावणी संतोष गोरे (द्वितीय), विशाखा विकास आगळे (तृतीय), तन्वी श्रीकांत दहीवाळ (उत्तेजनार्थ), भूमी राम शेळके (उत्तेजनार्थ), तेजल सचिन साळुंखे (उत्तेजनार्थ) यांना पारितोषिक देण्यात आले. तर चित्रकला स्पर्धेत महाविद्यालयीन गटात समर्थ महेंद्रकुमार वाघमारे (प्रथम), प्रवीण आबासाहेब राठोड (द्वितीय), तनुजा राधाकिसन पेंढारे (तृतीय), युगसाक्षी अतुलकुमार गायकवाड (उत्तेजनार्थ), ऋतुजा सुकांत जोशी (उत्तेजनार्थ) पारितोषिक देण्यात आले. राजमाता जिजाऊ जन्मोत्सव निमित्त घेण्यात आलेल्या वेशभूषा स्पर्धेत मोठा गट साक्षी सोळुंके (प्रथम), तेजस्वी लांडे (द्वितीय), श्रुती बादाडे (तृतीय), आराध्या काळे, सेरानी घोडके, आराध्या जव्हेरी यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.लहान गट स्पर्धेत परिणीती सचिन शिराळे (प्रथम), प्रांजळ परमेश्वर पाटील (द्वितीय), श्रुती विकास डाके आणि वसुंधरा बहीर यांनी (तृतीय) क्रमांक पटकावला तर विशेष कौतुकास्पद म्हणून नक्षत्रा आशिषकुनार पवळ या अडीच वर्षाच्या चिमुकलीला पारितोषिक देण्यात आले.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!