बीड (प्रतिनिधी) बौद्धिक आणि सर्वांगीण विकास करण्याच्या मार्गाने अबॅकस गणितीय पध्दतीचा उपयोग होतो. बीड मधील अबॅकस व वैदिक स्टडी केंद्राद्वारे, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय , राज्य स्तरावर, अबॅकस आणि वैदिक चॅम्पियनशिप आयोजित केल्या जातात. राष्ट्रीय स्तरावरील ऑनलाईन अबॅकस पहिल्या लेवलपरीक्षां ज्युनियर ग्रुपमध्ये वेदिका जगतापला जागतिक अबॅकस चॅम्पियनशिपमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली आहे. बीडच्या अबॅकस सेंटर मध्ये 6 जानेवारी 2023 रोजी निकाल जाहीर झाल्याप्रमाणे सर्वोत्कृष्ट मेडल मिळवून वेदिका जगतापने सर्वोत्कृष्ट मेडलिस्ट रँकर चॅम्पियनशिपमध्ये सहभाग मिळवला आहे. जागतिक अबॅकस स्पर्धा फेब्रुवारी 2023 मध्ये होत असून त्यामध्ये भारतासह मोरोक्को, नेपाळ, श्रीलंका, युनायटेड किंग्डम, यु एस ए , सिंगापूर, झिंबाब्वे, दक्षिण आफ्रिका, देशांमधील पाच हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यी सहभाग घेणार आहेत. वेदिका जगतापच्या यशामध्ये अबॅकस शिक्षक यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. वेदिका जगतापची गणित विषयाबद्दलची मनात असणारी भीती दूर होऊन अनेक गणिते सहज आणि सोप्या पद्धतीने वेळेच्या आत मध्ये सोडवले जात आहेत असे सांगितले आहे. ओसाका अबॅकस असोसिएशन चेअरमन, आय सी एम एस मॅनेजिंग डायरेक्टर श्री प्रसाद अग्रवाल तामिळनाडू तसेच अरिस्तो किड्स मॅनेजिंग डायरेक्टर उज्वल पांडा ओरिसा आणि , जी एस ए अबॅकस असोसिएशनचे श्रीनिवासन कुमारण दिल्ली, अबॅकस स्टडी सेंटरचे आयोजक डॉ. ए एस घोडके यांनी वेदिका जगतापच्या मिळवलेल्या यशाचे अभिनंदन केले असून उज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. वेदिका ही बीड मधील ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल बीड मधील शाळेत इयत्ता पहिले चे वर्गात आहे.समाजातील सर्व स्तरांमधून वेदिका जगतापचे अभिनंदन होत असून या मध्ये तिला मार्गदर्शन लाभले ते खरे घोडके सर चे आणि साथ भेटली ते तिच्या आई ची तिची आई कांता मुळे या एस. पी. ऑफिस बीड येते पोलीस डिपार्टमेंट मद्ये जॉब ला असून आईने खूप वेळोवेळी वेदिकाला खुप लक्ष देऊन बारकाईने तिच्या कडून अभ्यास करून घेतला.उज्वल भविष्यासाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक व त्याचे आई,वडील , मित्र, नातेवाईक यांनी शुभेच्छा दिल्या आहेत .असे जिल्हा अबॅकस वितरक एस. ए. घोडके यांनी सांगितले.
चौकट
सर्वांगीन विकास करण्यासाठी भारतीय वैदिक तसेच अबॅकस गणित पध्दत फार उपयोगी आहे असे अबॅकस आणि वैदिक मॅथ मास्टर ट्रेनर एस. ए. घोडके यांनी सांगितले.















