Uncategorized

व्दारकादास मंत्री बँकेवरील प्रशासकराज समाप्त, बँकेची सुत्रे आता डॉ.आदित्य सारडा यांच्याकडे

मंत्री बँकेच्या अध्यक्षपदी डॉ.आदित्य सारडा उपाध्यक्षपदी शुभम चितलांगे यांची निवड जाहिर

मंत्री बँकेच्या अध्यक्षपदी डॉ.आदित्य सारडा
उपाध्यक्षपदी शुभम चितलांगे यांची निवड जाहिर
प्रतिनिधी | बीड

बिनविरोध निघालेल्या बीड शहरातील व्दारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेवरील प्रशासकाचा अस्त झाला असुन शुक्रवारी मंत्री बँकेच्या अध्यक्षपदी डॉ.आदित्य सुभाषचंद्र सारडा तर उपाध्यक्षपदी शुभम चितलांगे यांची वर्णी लागली आहे. अध्यक्षपदी निवड होताच डॉ. आदित्य सारडा यांनी मंत्री बँकेला गतवैभव मिळवुन देणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

बीड शहरातील व्दारकादास मंत्री नागरी सहकारी बँकेची नुकतीच पंचवार्षीक निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. शुक्रवार १३ जानेवारी २०२३ रोजी बँकेच्या सभागृहात सकाळी अकरा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी व्हि.एस.जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थीतीत मंत्री बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया झाली.अध्यक्षपदासाठी डॉ.आदित्य सुभाषचंद्र सारडा यांनी अर्ज दाखल केला. त्यांना सुचक म्हणून सतीश धारकर तर अनुमोदक म्हणून शेख मोहम्मद सलीम मोहम्मद फकीर हे राहिले.अध्यक्षपदासाठी आदित्य सारडा यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली. तर उपाध्यक्षपदासाठी शुभम चितलांगे यांचा अर्ज दाखल झाला होता. त्यांना सुचक म्हणून रधुनाथ चौधरी तर अनुमोदक म्हणून प्रल्हाद वाघ राहिले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मंत्री बँकेचे संचालक गिरीश गिल्डा, शुभम चितलांगे, संतोष लहाने, राहुल खडके, दिनेश देशपांडे, शेख मोहम्मंद सलीम, प्रल्हाद वाघ, रघुनाथ चौधरी,सुधाकर वैष्णव , आदिती सारडा,अंजली पाटील ,अरूण मुंडे ,राम गायकवाड, सतीश धारकर यांच्या प्रमुख उपस्थीतीत डॉ.आदित्य सारडा यांची अध्यक्षपदी तर शुभम चितलांगे यांची उपाध्यक्षपदी निवड जाहीर केली . यावेळी नुतन अध्यक्ष व उपाध्यक्षाचा सत्कार करण्यात आला. या निवडी बद्दल जिल्हाभरातुन स्वागत होत आहे.

शासनाने दोन वेळा आदेश देवुनही अधिकाऱ्यांनी निवडणूक घेतली नाही

महाराष्ट्र शासनाने १० मार्च २०२२ मध्ये मंत्री बँकेची निवडणूक तातडीने घ्यावी असे आदेश पारीत केले होते. त्यांनतर सहकार निवडणूक प्राधिकरण आणि सहकार आयुक्तांनी सुध्दा निवडणूक घ्यावी म्हणून जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना आदेशीत केले होते. परंतु तत्कालीन निवडणूक अधिकारी विश्वास देशमुख यांनी बँकेची निवडणूक घेतली नाही. उलट जिल्हा निवडणूक अधिकारी व बँकेचे प्रशासकीय अध्यक्ष एकच असल्याने देशमुख यांनी निवडणूक घेण्यास टाळाटाळ केली. त्यांनतर पुन्हा शासनाने १३ जुलै २०२२ रोजी आदेश काढून बँकेची निवडणूक घेण्याचे आदेश काढले. शेवटी निवडणूक घेतली नाही तर तातडीने खुलासा सादर करून कारवाईला सामोरे जावे असे आदेश शासनाने दिले होते.

मंत्री बँकेला गतवैभव मिळवुन देणार

बँकेचा लवकरच आढाव घेवुन मंत्री बँकेला आरबीआयने घालुन दिलेले निर्बंध कसे मुक्त होतील त्या दृष्टीने काम करणार आहे. ६० वर्ष जुनी व बीड जिल्हयातील दुसरी असलेल्या व्दारकादास मंत्री बँकेला पुन्हा गतवैभव प्रात्प करून देण्यासाठी आम्ही सर्व जण एकजुटीने प्रयत्न करणार आहोत. असे व्दारकादास मंत्री बँकेचे नुतन अध्यक्ष डॉ.आदित्य सारडा यांनी सांगीतले आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!