Uncategorized

रानडुकराच्या हल्ल्यात बैलगाडी उधळली, आजोबांसह नातवाचा तळ्यात बुडून मृत्यू


दिंद्रुड ( लोकाशा न्युज )-

धारूर तालुक्यातील कासारी येथील शेतात आपल्या दोन नातवांसोबत निघालेल्या एका शेतकरी आजोबाचा नातवासह तळ्यात बैलगाडी जाऊन दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत एक बैल दगावला असून मयत हे धारूर तालुक्यातील कासारी येथील शेतकरी आहेत.

कबीर बाशुमिया सय्यद (वय 70 वर्ष)हे आपला नातू आजमत अखिल सय्यद (वय दहा वर्ष)व आतिक अखिल सय्यद (वय १२वर्ष) या दोन नातवांसमवेत कासारी शिवारातील बालाघाट डोंगरात असलेल्या वाघदरा तलावाच्या मार्गाने शेताकडे आज गुरुवारी दुपारी बारा वाजे दरम्यान निघाले होते. याच दरम्यान तलावाच्या काठावर असलेल्या रानडुकरांनी बैलांवर हल्ला केल्याने बैल बिथरले व बैलगाडी तलावात बुडाली जवळपास 50 फूट बैलगाडीला बैलांनी ओढत नेत असताना कबीर सय्यद व आजमत सय्यद यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. याचवेळी आतिक अखिल सय्यद हा एका बैलावर बसून तलावा बाहेर आला त्यामुळे तो वाचला. ही घटना तलावाजवळ म्हैशी चालत असलेल्या मोतीराम सदाशिव उघडे या शेतकऱ्याने पाहिली त्यांनी आरडाओरडा केल्याने तलावाच्या आसपास असलेल्या शेतकऱ्यांनी तलावात उडी घेत दोन्ही बैलांना बाहेर काढले. मात्र कबीर सय्यद व आजमत सय्यद ला तोपर्यंत पाण्यात बुडून मृत्यू पावला होता. दरम्यान दिंद्रुड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत मयतांचा पंचनामा करत शव भोगलवाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवले. या घटनेने कासारीसह धारूर तालुक्यात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!