कोरोनाच्या संकटात मोदींचा शेतकऱ्यांना मोठा आधार
आज साडे आठ करोड शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसानचे 17 हजार कोटी जमा होणार
बीड, दि. 9 (लोकाशा न्युज): कोरोनाचे संकट संपूर्ण जगावर घोगत आहे, भारतातील नागरिकांनाही या संकटाचा सामना करावा लागत आहे, या संकटात मात्र प्रत्येक नागरिकांच्या पाठीशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खंबीरपणे उभे असल्याचे पाहायला मिळत आहे, शेतकऱ्यांना तर त्यांनी पावलो पावली मदतीचा हात दिला आहे आणि देतही आहेत, या संकट काळात मदतीचा हात म्हणून आज दि. 9 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजनाच्या अंतगर्त 8.5 करोड़ शेतकऱ्यांना 17,000 करोड़ रुपयांचे हस्तांतरण करणार आहेत, ही रक्कम कोरोनाच्या संकटात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा आधार देऊन जाणार आहे, याबरोबरच मोदी एक लाख करोडच्या कृषि इंफ्रास्ट्रक्चर फंडचाही यावेळी शुभारंभ करणार आहेत, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिली आहे.