परळी दि. ०७ —
तालुक्यातील अस्वलंबा ग्रामपंचायत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या धंनजय मुंडे यांना जोरदार धक्का दिला आहे. सरपंचांसह तीन जागा बिनविरोध जिंकून पंकजाताई मुंडे यांनी आपलं वर्चस्व कायम राखलं आहे. ही ग्रामपंचायत धनंजय मुंडेंना एकदाही जिंकता आली नाही हे विशेष.
पंकजाताई मुंडे व खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे ज्येष्ठ नेते जीवराज ढाकणे यांच्या हातात अस्वलंबा ग्रामपंचायतीची सुत्रे पुन्हा एकदा आली आहेत. नऊ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीत सरपंचपद हे अनुसुचित जातीसाठी राखीव होते. सरपंचपदाचे उमेदवार दत्तू महादेव जोगदंड हे बिनविरोध सरपंच म्हणून निवडून आले आहेत. उर्वरित सदस्यांमध्ये सर्वश्री चिंतामणी जाधव, महादेव जाधव, शालूबाई जाधव हे बिनविरोध विजयी झाले आहेत, बाकीच्या चार जागेसाठी निवडणूक होणार आहे.
नवनिर्वाचित सरपंच जोगदंड आणि विजयी सदस्यांचे पंकजाताई मुंडे, खा. प्रितमताई मुंडे यांनी अभिनंदन केले आहे.
••••















