Uncategorized

शिवाजीनगर पोलिसांची भ्रष्ट निती अखेर उघड, विनयभंगाचा गुन्हा बी फायनल करण्यासाठी पन्नास हजारांची लाच मागितली, लाचेचे दहा हजार घेताना एका एपीआयसह पोलिस कर्मचार्‍याला रंगेहाथ पकडले, औरंगाबाद एसीबीची बीडमध्ये कारवाई


बीड, दि. 5 (लोकाशा न्यूज) : मागील अनेक दिवसांपासून शिवाजीनगर ठाण्यात फक्त वसुलीचेच काम सुरु आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याची निष्क्रिय कार्यपद्धती माध्यमांनी वारंवार समोर आणलेली आहे. अखेर सोमवारी (दि.5) सायंकाळी आठच्या सुमारास दोन लाचखोरांचा चेहरा एसीबीने केलेल्या कारवाईने समोर आला आहे. एसीबीच्या या कारवाईने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदाराला विनयभंगाचा गुन्हा बी फायनल करण्यासाठी 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. त्यातील दहा हजार रुपये यापुर्वी घेतलेले आहेत. तर त्यातील 10 हजाराची लाच घेताना शिवाजीनगर ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक राजु गायकवाड व पोलीस कर्मचारी विकास यमगर या दोघांना रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई शहरातील बसस्थनका समोरील उडपी हॉटेलात करण्यात आली. ही कारवाई औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टिमने केली आहे. या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!