Uncategorized

खून प्रकरणातील आरोपीच्या पळून जाण्याच्या प्रयत्नामुळे पोलीस वाहनाला अपघात, पोलीस अधिकाऱ्यासह चार पोलीस कर्मचारी व आरोपी जखमी,नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील घटना

बीड : नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत चुलत्याची हत्या करणाऱ्या आरोपीला घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी पोलीस वाहनातून आज (ता. 28) घटनास्थळी नेण्यात येत होते. याच दरम्यान आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न करत वाहन चालकाच्या हातातील स्टेरिंग हाता घेण्याचा प्रयत्न केला यामुळे गाडीचा अपघात झाला. यात नेकनूर पोलीस ठाण्याचे प्रमुख शेख मुस्तफा जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी बीड येथे आण्यात आले आहे. यासह चार कर्मचारी व आरोपीसुद्धा यात जखमी झाला आहे.

तालुक्यातील मुळूक याठिकाणी गेल्या दोन दिवसापुर्वी जमिनीच्या वादातुन पुतण्याने चुलता व चुलतीवर धारदार कोयत्याने वार केले होते, यात चुलता ठार झाला होता. या प्रकरणातील आरोपींला घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी आज पोलीस घेऊन जात होते. याच वेळी आरोपी रोहीदास निर्मळ यांने पळून जाण्याचा प्रयत्न केला. चक्क वाहनचालकाच्या हातून स्टेरिंग हातात घेण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलीस वाहनाचा अपघात झाला. यात नेकनूर पोलीस ठाणे प्रमुख शेख मुस्तफा यांच्या डोक्याला चांगला मार लागला असून त्यांना बीड येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यासह इतर चार पोलीस कर्मचारी सुद्धा जखमी झाले आहेत. तसेच आरोपी हा सुद्धा जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच मांजरसूबा हायवे पोलीसांनी घटनास्थळी जाऊन जखमींना उपचारासाठी बीड मध्ये आणले होते. पोलीस उपनिरीक्षक श्री घोडके व त्यांच्या टीम मधील श्री खताळ, श्री तांदळे, श्री शिंदे यांच्या मदतीमुळे जखमींना तात्काळ उपचार मिळण्यास मदत मिळाली.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!