बीड, दि. 18 (लोकाशा न्यूज) : जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील साडे तिनशे पोलिस कर्मचार्यांचे प्रमोशन केले आहे. पोलिस अधीक्षकांचा हा मोठा निर्णय असून इतिहास पहिल्यांदाच सर्वात जास्त पोलिस कर्मचार्यांना पदोन्नती मिळाली आहे. पोलिस अधिक्षकांनी घेतलेल्या निर्णयानुसार जिल्ह्यातील 55 पोलिस हवालदार सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक तर 295 पोलिस नाईक हवालदार बनले आहेत. पोलिस अधीक्षकांच्या या निर्णयाचे संपूर्ण बीड पोलिस दलाकडून अभिनंदन केले जात आहे.
राज्य शासनाने पोलीस नाईक हा संवर्ग रद्द घोषित करून त्या संवर्गातील पदे शिपाई, हवालदार व सहायक फौजदार संवर्गामध्ये वर्ग करण्यास मान्यता दिली होती. त्या निर्णयाच्या अधीन राहून बीडचे पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी नुकतेच आदेश काढले असून त्यामध्ये बीड जिल्ह्यातील 55 पोलिस हवालदार यांना बढती मिळाली असून ते सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक झाले आहेत. तर 295 पोलिस नाईक यांची हवालदारपदी बढती करण्यात आली आहे. इतिहास पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या कर्मचार्यांना पदोन्नती मिळाली आहे. पोलिस अधीक्षकांचे काम खरोखरच कौतूकास्पद आहे. त्यानुषंगानेच त्यांचे आणि त्यांनी काढलेल्या निर्णयाचे संपूर्ण बीड जिल्हा पोलिस दलाकडून कौतूक केले जात आहे. विशेष पदोन्नती मिळालेल्या पोलिस कर्मचार्यांना स्वत: पोलिस अधीक्षकांनी पुष्पगुच्छ देवून सन्मान केला आहे.
डी.जी.चव्हाण यांची मेहनत कामी आली
पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी काल जिल्ह्यातील 350 पोलिस कर्मचार्यांना पदोन्नती दिली. यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयाचे आस्थापना प्रमुख डी. जी. चव्हाण यांनी पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनानुसार मोठी मेहनत घेतलेली आहे. त्यांच्या या मेहनतीचे अनेकांना आज प्रत्यक्ष फळ मिळाले आहे.
जशा जागा रिक्त होतील,
त्यानुसार कर्मचार्यांना पदोन्नती मिळणार
जशा जागा रिक्त होतील त्यानुसार त्या ठिकाणी पोलिस कर्मचार्यांना पदोन्नती दिली जाणार आहे. जुलैपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.