Uncategorized

इंग्लंड-पाकिस्तान मॅचवर सट्टा; चौघांवर गुन्हा दाखल; तीन लाखाचा मुद्देमाल जप्त

बीड, काल इंग्लंड-पाकिस्तानमध्ये टी ट्वेन्टी वर्ल्डकपचा फायनल सामना सुरू असताना अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत सट्टा लावण्यात येत होता. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकून सट्टा लावणार्‍या चौघा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 3,20,000 चा मुद्देमाल जप्त केला.
ऑनलाईन फ्रॉडच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. आता क्रिकेटवर सट्टाही ऑनलाईन लावला जातो. हे सट्टेबहाद्दर एखाद्या वाहनात, उंच डोंगरावर, आड रानात कुठेही बसून सट्टा घेतात. अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतील दस्तगीर वाढीतील शिवारात भाकरे यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये इंग्लंड-पाकिस्तान या फायनल टी ट्वेन्टी वर्ल्डकपच्या मॅचवर सट्टा सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख पीआय सतिष वाघ यांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी एक पथक त्याठिकाणी पाठवले. पथकाने खाजगी वाहनाने जावून त्याठिकाणी धाड टाकली. यावेळी राम नंदकिशोर मुळे (वय 30) अजय नंदकिशोर मुळे (वय 27) दोन्ही रा.हिंदमाता चौक अंबाजोगाई, विशाल पंडितराव चाटे, रा.बंकटगल्ली अंबाजोगाई, बिभीषण सुधाकर भालेराव रा.पाथरी चौक अंबाजोगाई या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सट्टा लावण्यासाठी लागणारे साहित्य रोख असा मिळून 3 लाख 20 हजार 520 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!