Uncategorized

गावंदरा येथील अल्पवयीन मुलीवर 48 वर्षीय नराधमाने केला बलात्कार, पिडीतेच्या आईच्या फिर्यादीवरून धारूर पोलीसात गुन्हा दाखल


किल्ले धारूर
( लोकाशा न्यूज ) धारूर तालुक्यातील गावंदरा येथील पंधरा वर्षीय मुलीवर त्याच गावातील रहिवाशी असलेल्या 46 वर्षीय नराधम अर्जुन मारुती बडे याने अत्याचार करून ही घटना कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आहे पीडितेच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपीवर धारूर पोलिसात बलात्कार व पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे पोलीस पुढील तपास करत आहे

सविस्तर माहिती अशी की दि. 12 नोव्हेंबर शनिवार रोजी धारूर तालुक्यातील गवंदरा येथे दुपारी बारा ते एक च्या दरम्यान पिडित अल्पवयीन मुलगी तिच्या घरासमोरील दारामध्ये बसलेली असतात आरोपी नामे अर्जुन मारुती बडे पीडित मुलीच्या घरासमोर आला व शिवीगाळ करत स्वतःच्या घरी पीडित मुलीला ओढत नेऊन संबंधित अल्पवयीन पीडितेवर अत्याचार केला व या घटने संदर्भात कोणाला माहिती दिली तर फाशी देऊन मारून टाकेल अशी धमकी दिली यानंतर पीडित मुलगी तिच्या घरी गेली व ऊस तोडणी गेलेल्या आपल्या आई-वडिलांना फोन करून याबाबत माहिती दिली त्यानंतर घटनेच्या दुसऱ्या दिवशी मुलीच्या आई वडील यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत नराधम अर्जुन बडे याच्या विरोधात धारुर पोलिसात 376 ,504,506,34 पोक्सो 4,8,12,324 या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पी एस आय घोडे करत आहेत

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!