Uncategorized

शेतकऱ्यांचा वीजपुरवठा तोडू नये-माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांची शासनाकडे विंनती

मुंबई/प्रतिनिधी

अतिवृष्टीमुळे आधीच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले त्यातच वीज वितरण कंपनीकडून थकीत वीज बिलामुळे वीज कनेक्शन तोडले जात आहेत त्यामुळे सध्या असलेल्या पिकांना पाणी देण्यात अडचणी येऊ लागल्या आहेत, शेतकऱ्यांचा वीज पुरवठा तोडू नये अशी विंनती माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे

बीड जिल्ह्यांत परतीच्या पावसाने खरीप पीकाचे प्रचंड नुकसान झाले आहे.आता शेती पीकांना विहीरीतुन पाणी देणे नितांत आवश्यक असल्यामुळे शेतकऱ्यानी ईलेक्ट्रीकल मोटारी चालु ठेवल्या आहेत. परंतु या महिण्यात बीड जिल्ह्यांत थकीत वीजबीलामुळे एम एस.ई .बी ने घावुक पध्दतीने वीजपुरवठा खंडीत केला आहे. त्यामुळे उरली – सुरली पीके पाण्या अभावी जळुन जातील,त्यामुळे तुर्त शेतकऱ्याचा शेतीवरील विजपुरवठा तोडु नये .अशी विंनती माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!