राज्य सरकारच्या गृह विभागाने सोमवारी सायंकाळी 109 पोलिस उपायुक्तांच्या बदल्यांचे आदेश काढले होते.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी बदली झालेल्या अधिकाऱ्यांपैकी त्यापैकी 9 जणांच्या पदस्थापनेला तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्यात आली.
गृह विभागाचे (आस्थापना) अतिरीक्त पोलिस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी याबाबत मंगळवारी आदेश काढले. त्यामध्ये पुणे शहर पोलिस दलातील परिमंडळ पाचच्या पोलिस उपायुक्त नम्रता पाटील यांच्यासह प्रशांत मोहिते, संदिप डोईफोडे, दिपक देवराज, सुनील लोखंडे, प्रकाश गायकवाड,तिरुपती काकडे, योगेश चव्हाण, शर्मिष्ठा घार्गे (वालावलकर) या पोलिस अधिकाऱ्यांची नावे वगळून इतर अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यमुक्त करण्याचे व नव्या ठिकाणी रुजु होण्याबाबत आदेश दिला आहे. नम्रता पाटील यांचा कार्यकाळ पुर्ण झाला असून सोमवारी आलेल्या आदेशामध्ये त्यांना मुंबईतील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिस अधिक्षकपदी नियुक्ती देण्यात आली होती. संबंधित 9 अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेबाबत लवकरच नव्याने आदेश निघण्याची शक्यता आहे.