Uncategorized

सुप्रीम कोर्टाचा निर्णय आर्थिक दुर्बल घटकांच्या भावी पिढयांसाठी सकारात्मक, पंकजाताई मुंडे यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार

मुंबई । दिनांक ०७।
आर्थिक दुर्बल घटकांचे दहा टक्के आरक्षण वैध असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हा निर्णय आर्थिक दुर्बल घटकाला न्याय देणारा असून त्यांच्या भविष्यातील पिढयांसाठी सकारात्मक आहे असे त्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने आर्थिक दुर्बल घटकांना दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता, आज तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवला आहे. आर्थिक दुर्बल घटकांसाठी हा निर्णय न्याय देणारा आणि त्यांच्या भविष्यातील पिढ्यांसाठी सकारात्मक असा आहे,या निर्णयाचे मी स्वागत करते असं सांगून पंकजाताई मुंडे यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आहेत.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!