सिरसाळा न्यूज : सिरसाळा पोलिसांनी सिरसाळ्यातील जुगार अड्ड्यावर धाड टाकत कार्यवाही केली आहे. एकाच परिसरात दोन ठिकाणी सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर कार्यवाही करत ३ लक्ष १५ हजार ३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ह्या कार्यवाहीत एकूण २० जुगा-यावर कार्यवाही झाली आहे.तीन मोटार सायकल ,रोख रक्कम व जुगार साहित्य जप्त करण्यात आले आहेत. दिनांक ५ वार शनिवार रोजी दुपार च्या दरम्यान हि कार्यवाही झाली आहे. पोलीस स्टेशन हद्दीतील हि मोठी कार्यवाही आहे.स्थानिक पोलीस प्रशासन अवैध धंद्यावर कार्यवाही जोमात करु लागली आहे. अवैध धंद्यावाल्यांचे धाबे दनानले आहेत. सह पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांच्या मार्गदर्शनात पिएसआय नागरगोजे व बीट अमलदार शेंगूळे ,सोनवणे सह इतर कर्मचाऱ्यांनी हि कार्यवाही केली आहे .