- बीड : डाॅक्टरांनी चुकीच्या पद्धतीने सिझर केल्याने एका महिलेस आपले प्राण गमवावे लागल्याची घटना सिरसाळ्यात घडली आहे.शितल विठ्ठल बागवाले वय २३ वर्षे असे त्या मयत मातेचे/महिलेचे नाव आहे.या विषयी मयताचे नातेवाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे कि,
दिनांक १७ ऑक्टोबर, वार सोमवार रोजी, वेळ सकाळी ११ : ३० वाजता सिरसाळ्यातील डाॅक्टर नावंदर दांपत्य यांच्या जमूना क्लिनीक मध्ये प्रसुती झाली. दरम्यान डाॅक्टर रश्मी नावंदर यांनी हि प्रसूती नाॅर्मल करते म्हणून विश्वास व्यक्त केला. नाॅर्मल प्रसुती होत नसल्याने थेट सिझर केले . दुपारी ३ वाजता रुग्णाची तब्बेत खालावली म्हणून नातेवाईकांना संबंधित दवाखान्यातून डाॅक्टर ने कळवले व रुग्णास परळी ला कराड हाॅस्पिटल मध्ये घेऊन जाण्यास सांगितले. परळी येथील कराड हाॅस्पिटल मध्ये सांगितल्या गेले कि,गर्भ पिशवी फाटली आहे, शिवावी लागेल पंरतु रुग्णाची गंभीर परिस्थिती समजता रुग्णास अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात हलवण्याचे कराड यांनी सुचवले , या नुसार सायंकाळी ६ वाजता अंबाजोगाई शासकीय रुग्णालयात दाखल केले. तपासणी केले असता डाॅक्टर म्हणाले कि, प्रसुती वेळी सिझर दरम्यान गर्भ पिशवी फाटली आहे . ऑपरेशन करुन काढावी लागेल. तद्नंतर ऑपरेशन रात्री ९ वाजता ऑपरेशन केले. पंरतु अंबाजोगाई शासकीय रुग्णालयातील डाॅक्टरांच्या अथक प्रयत्नाना यश आले नाही. सिरसाळ्यात चुकीच्या पद्धतीने सिझर झाल्या मुळे रक्त वाहिण्या तुटल्या,खुप रक्त प्रवाह झाला व गर्भ पिशवी फाटली या मुळे सदर रुग्ण दगावला असल्याचे अंबाजोगाई शासकीय रुग्णालयातील डाॅक्टरांनी नातेवाईकांना सांगितले. मयत महिलेचा पती विठ्ठल कमलाकर बागवले वय २७ वर्षे रा.सिरसाळा ता.परळी वै.यांनी डाॅक्टर नावंदर दांपत्या विरुद्ध सिरसाळा पोलीस स्टेशन मध्ये दिनांक २४ ऑक्टोबर रोजी तक्रार दिली आहे .पंरतु ह्या प्रकरणी सिरसाळा पोलीस स्टेशन मध्ये दिनांक २६ वार बुधवार पर्यंत गुन्हा दाखल नाही. ● शल्यचिकित्सकांच्या समिती अहवाल आल्यानंतर गुन्ह्या दाखल होणार – सह पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे : ह्या प्रकरणी तक्रारीनंतर दोन दिवस उलटूनही गुन्हा दाखल करण्यात आला नाही म्हणून विचारले असता सिरसाळा पोलीस स्टेशनचे सह पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे म्हणाले कि,अशा प्रकरणात शल्यचिकित्सकांचा अहवाल लागतो, शल्यचिकित्सकांची समिती पाहणी/तपासणी करुन संबंधित डाॅक्टर रुग्णाच्या मृत्यस जबाबदार आहेत कि नाही,या संबधी अहवालानुसार पुढील कार्यवाही केली जाते.म्हणून अद्याप गुन्हा दाखल केला नाही. पोलीस अधिक्षक कार्यालयास कळवले आहे.सुट्ट्या असल्या मुळे शल्यचिकित्सकांशी आम्ही पत्र व्यावहार करु शकलो नाहीत, पोलीस अधिक्षक कार्यालयातून शल्यचिकित्सकांना कळवले जाईल. असे सपोनि एकशिंगे यांनी म्हटले आहे .
error: Content is protected !!