बीड, दि. 24 (लोकाशा न्यूज) : बीडमधील कुटे उद्योग समूह गेल्या काही वर्षांपासून दिवाळीनिमित्त बीड जिल्ह्यातील उपेक्षितांसोबत साजरी करत आहे. यावर्षीही प्रत्येक पालावर, वस्त्यावर जावून चार हजार कुटुंबाला दिवाळीचे साहित्य आणि फराळाचे वाटप केले. कुटे उद्योग समुहाचे हे काम अविरत चालू आहे. त्यामुळे कुटे ग्रुपचे सर्वेसर्वा सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांच्या या सामाजिक कामाचे कौतूक करावे तेवढे कमीच आहे.
बीडमधील कुटे उद्योग समुहाच्या वतीने उपेक्षित आणि अत्यंत गरिब कुटुंबाची दिवाळी समाधानात आणि आनंदामध्ये जावी यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर दिवाळी भेट, फराळाचे साहित्य वाटप करत असते. यंदाही उद्योग समुहाच्या वतीने उपेक्षित अशा चार हजार कुटुंबांपर्यंत पोहचून दिवाळीचे साहित्य आणि फराळाचे वाटप केले. उपेक्षित कुटुंबाची दिवाळी चांगली व्हावी, त्यांचे घर प्रकाशाने उजळून जावे यासाठी कुटे ग्रुपचा हा प्रयत्न गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. कोरोनामध्ये या उद्योग समुहाच्या वतीने 25 हजार कुटुंबाच्या घरापर्यंत अन्नधान्य पोहचविण्याचे काम झाले होते. तेव्हापासून आजपर्यंत बीड शहरातील भीक मागून जगणारे 400 भिकार्यांना रोज दोनवेळचे जेवण अविरतपणे पोहचविण्याचं काम तीन वर्षापासून सुरू आहे. प्रत्येक मंदिराच्या भोवती बसणार्या या भिकार्यांसाठी पॅकिंग जेवण, सोबत पाण्याची बाटली पोहचवली जाते.