बीड, दि. 21 (लोकाशा न्यूज) : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील प्रशासक मंडळाची मुदत संपली होती, विशेष म्हणजे कामाच्या अतिरिक्त ताणामुळे जिल्हा बँकेची जबाबदारी इतर अधिकार्यावर सोपवावी, अशी स्वत: अविनाश कदम यांनी मागणी केली होती. मात्र राज्य सरकारने पुन्हा एकदा बँकेचा कारभार याच अधिकार्यांच्या हाती दिला आहे. बँकेच्या पूर्वीच्या प्रशासक मंडळातील अशासकीय सदस्य वगळून केवळ अविनाश पाठक आणि अशोक कदम या अधिकार्यांच्या प्रशासक मंडळाला मुदतवाढ देण्यात आली आहे.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेवर नवे प्रशासकिय मंडळ येणार याची चर्चा सुरू होती. विशेष म्हणजे या प्रशासक मंडळाचा पदभार माझ्याकडून काढून घ्यावा, असे लेखी पत्र अविशान पाठक यांनी दिले होते, मात्र जुन्याच प्रशासक मंडळाला सरकारने मुदतवाढ दिली आहे. त्यातून तीन अशासकीय सदस्य वगळण्यात आले आहेत. आता अप्पर आयुक्त अविनाश पाठक आणि सहायक निबंधक अशोक कदम हे दोघेच जिल्हा बँकेचा कारभार पाहणार आहेत.