बीड, आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एकही गुन्हा घडणार नाही याची काळजी बीड शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवी सानप आणि त्यांची पूर्ण टीम घेत आहे जर एखादा गुन्हा घडला तर त्याचा तपासही तात्काळ लावला जात आहे अशाच एका घरफोडीचा तपास लावून या घरफोडीतील पावणे चार लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्याकडून जप्त करून तो सदर फिर्यादीला पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी परत देण्यात आला आहे या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी पोलीस निरीक्षक रवी सानप आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे
पो स्टे बीड शहर गु र न 153/2022 कलम 457,380 भा द वि मधील जप्त मुद्देमाल सोन्याचे दागिने ज्यात गंठण,पोहेहार,चार बांगड्या असे एकूण 378187 /- चे सोन्याचे दागिने आज दि 15/10/2022 रोजी मा.पोलीस अधीक्षक साहेबांचे हस्ते मा.न्यायालयाचे आदेशाने फिर्यादी सौ.मंगल कृष्ण कुमार काळेगावकर रा.बोबडेश्वर गल्ली बीड यांना परत देण्यात आले आहेत.
सदर घरफोडी हि सराईत आरोपीसह संपूर्ण मुद्देमाल दोन दिवसांचेआत उघड केली
यात मा SP सर, अप्पर पोलीस अधीक्षक लांजेवार सर SDPO वाळके सर यांचे मार्गदर्शनखाली पोनि सानप, DB पथकाचे HC सिरसाट, मनोज परजने,अविनाश सानप, अश्फाक सय्यद यांनी कामगिरी केली आहे