बीड, दि. 12 (लोकाशा न्यूज) : आयएएस आस्तिककुमार पाण्डेय यांच्यावर आता औरंगाबादच्या जिल्हाधिकारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यापुर्वी त्यांनी औरंगाबाद महानगर पालिकेच्या आयुक्त पदाची जबाबदारी सक्षमपणे संभाळली होती, बीडला कलेक्टर असतानाही त्यांनी आपल्या कामातून जिल्ह्यातील अनेक प्रश्न सोडविले होते, त्यामुळेच आजही आस्तिककुमार पाण्डेय यांचे नाव बीड जिल्ह्यातील अनेकांच्या मनामनामध्ये घर करून बसलेले आहे. आता औरंगाबाद कलेक्टर म्हणूनही ते अत्यंत चोख पध्दतीने कर्तव्य बजावतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
error: Content is protected !!