परळी वैजनाथ । दिनांक १०।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या उज्जैनच्या महाकाल मंदिर काॅरिडोरचे लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमास पंतप्रधानां समवेत भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा मध्यप्रदेशच्या सहप्रभारी पंकजाताई मुंडे हया देखील उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, हा कार्यक्रम शहरातील नागरिकांना थेट लाईव्ह पाहण्याची सोय करण्यात आली असून खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यावेळी उपस्थित राहणार आहेत.
काशी विश्वनाथ काॅरिडोरच्या धर्तीवर उज्जैन येथे ८५६ कोटी रूपये खर्च करून सुमारे ४७ हेक्टरवर महाकाल मंदिर काॅरिडोर उभारण्यात आला आहे. भगवान शंकराचे अद्भुत, अकल्पनीय आणि अलौकिक विश्वाचे दर्शन यातून होणार असून या काॅरिडोरला
‘महाकाल लोक’ असे नाव देण्यात आले आहे. उद्या याचे लोकार्पण पंतप्रधान मोदी करणार असून पंकजाताई मुंडे प्रमुख अतिथी असणार आहेत.
परळीत लाईव्ह कार्यक्रम पाहण्याची सोय
उद्या (ता. ११) सायंकाळी ५ ते रात्रौ ८ वा. दरम्यान हा कार्यक्रम परळीतील नागरिकांना लाईव्ह पाहता येणार आहे, त्याकरिता प्रभू वैद्यनाथ मंदिराच्या पायऱ्यांवर भाजपच्या वतीने मोठा स्क्रीन लावण्यात येणार आहे. खासदार डॉ.प्रितमताई मुंडे हया याप्रसंगी उपस्थित असणार आहेत. लोकार्पण निमित्ताने प्रभू वैद्यनाथास अभिषेक देखील करण्यात येणार आहे. शहरातील सर्व नागरिकांनी तसेच भाजपच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी यावेळी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे.
••••