कडा / वार्ताहर
तालुक्यातील पाटण सांगणी येथील तरूण दुचाकीवर तुळचापूरला ज्योत आणायला जात असतांना येरमाळा शहराजवळ त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. या अपघातात अमोल खिलारे (वय-३५) व महेश भास्कर भोसले (वय-३०) या तरुणांचा मृत्यू झाला आहे.
नवरात्रोत्सव सोमपासून सुरू होत असल्याने गावा-गावातून तरुण दरवर्षी घटस्थापनेच्या अगोदर देवीची ज्योत आणण्यासाठी तुळजापूरला जातात. यावर्षी आष्टी तालुक्यातील पाटण सांगणी येथील तरूण तुळजापूरला ज्योत आणायला जात असतांना धुळे- सोलापूर महामार्गावर येरमाळा शहराजवळ त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. या अपघातात पाटण सांगवी येथील उपसरपंच अमोल सुरेश खिलारे व कडा प्रा. आ. केेंद्राचे आरोग्य सेवक महेश भास्कर भोसले यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. या तरुणांच्या अपघाती निधनाने सांगवी पाटण गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
———-%%%————-