Uncategorized

मुलं पळविणाऱ्यांची टोळी आली, ही फक्त अफ़वाच, कोणत्याही अफवावर विश्वास ठेऊ नका – पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांचे आवाहन

बीड, जिल्ह्यात लहान मुलांना पळवणारी टोळी सक्रिय असल्याची अफवा पसरत आहे, या अफवेची पोलिसांनी शहानिशा व सखोल चौकशी केली असता ही अफवा तत्यहीन व खोटी असल्याची खात्री झाली आहे.शाळा, महाविद्यालय परिसरात पोलिसांची गस्त वाढवण्यात आली आहे .पोलीस यंत्रणा सतर्क असून या संदर्भातील काही जुने किंवा इतरत्रचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत मात्र त्याचा बीडशी काहीही संबंध नाही,असे व्हिडिओ विनाकारण व्हायरल करू नयेत.जर कोणी जाणीवपूर्वक अशी अफवा पसरवत असल्याचे आढळून आल्यास कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल.
आपल्या मुलांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, घर ,गल्ली, परिसरात कोणीही अनोळखी व्यक्ती, संशयास्पद व्यक्ती आढळल्यास जवळच्या पोलीस ठाणेस त्वरित कळवावे. तसेच कोणीही संशयास्पद समजून कोणत्याही व्यक्तीला मारहाण करू नये,अशा प्रकारे कायदा हातात घेऊ नये पोलिसांशी संपर्क करावा.
पोलीस नियंत्रण कक्ष बीडचे दूरध्वनी क्रमांक
02442-222333,
02442-222666
डायल 112 (हेल्पलाइन)

  • नंदकुमार ठाकूर
    पोलीस अधीक्षक,बीड

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!