Uncategorized

बीडमध्ये एटीएसची छापेमारी, टेरर फंडिंग प्रकरणी बीडच्या खासबागेतून एकाला उचलले, पीएफआय संघटनेशी ‘त्या’ तरूणाचा संबंध असल्याचा संशय


बीड/मुंबई, दि. 22 (लोकाशा न्यूज) : मुंबईतील एका न्यायालयाने गुरुवारी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पीएफआय) पाच सदस्यांना 26 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) कोठडीत पाठवले. या सर्वांवर समुदायांमध्ये शत्रुत्व वाढवणार्‍या बेकायदेशीर कामांमध्ये’ आणि देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याचा’ आरोप आहे. राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) नेतृत्वाखालील अनेक एजन्सींच्या देशव्यापी ऑपरेशनचा एक भाग म्हणून एटीएसने गुरुवारी राज्यातील विविध ठिकाणांहून पीएफआयच्या एकूण 20 सदस्यांना अटक केली. यातील पाच जणांना येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 दिवसांच्या कोठडीत देण्याची विनंती एटीएसने न्यायालयाला केली. मात्र, न्यायालयाने त्याला पाच दिवस तपास यंत्रणेच्या कोठडीत पाठवले. विशेष म्हणजे बीडमधूनही एटीएसने एका तरूणाला उचलले आहे.
देशातील दहशतवादी कारवायांचे समर्थन केल्याच्या आरोपाखाली गुरुवारी 11 राज्यांमध्ये एकूण 106 पीएफआय सदस्यांना अटक करण्यात आली. महाराष्ट्रात एटीएसच्या पथकाने मुंबई, नवी मुंबई, ठाणे, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, बीड, परभणी, नांदेड, मालेगाव (नाशिक जिल्ह्यातील) आणि जळगाव येथे छापे टाकले. एटीएसने बीड शहरातील खासबागेतील एका तरूणास अटक केली आहे. दरम्यान या छापेमारी नेमके काय काय सापडले याची माहिती मात्र रात्री उशीरापर्यंत मिळू शकली नाही.

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!