Uncategorized

पंकजाताई मुंडेंच्या उपस्थितीत रविवारी परळीत ‘सेवा पंधरवडा’ निमित्त विविध उपक्रम, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य ; रक्तदान शिबीर, स्वच्छता मोहिम, वृक्षारोपण आदींचं आयोजन

परळी । दिनांक २२।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस संपूर्ण देशभर ‘सेवा पंधरवडा’ म्हणून साजरा होत असून त्या अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून परळीत येत्या रविवारी (ता.२५) भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबीर, स्वच्छता मोहिमेसह विविध ‘सेवा उपक्रम’ आयोजित साजरा करण्यात आले आहेत.

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस १७ सप्टेंबर ते महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर या दरम्यान भाजपच्या वतीने 'सेवा पंधरवडा' राबविण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून शहरात भाजपच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सेवा उपक्रमात पंकजाताई मुंडे स्वतः सहभागी होणार आहेत. शनिवारी २४ तारखेला सकाळी ९ वा.भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने उप जिल्हा रूग्णालयात  रक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. २५ रोजी सकाळी ९.३० ते ११.३० वा. दरम्यान काळरात्री देवी मंदिर, बौध्दविहार (भीमनगर), लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज मंदिर व मलिकपुरा भागातील दर्ग्याची स्वच्छता पंकजाताई मुंडे हया कार्यकर्त्यांसमवेत करणार आहेत. भीमनगर भागातील  स्मशानभूमीत पंकजाताईंच्या हस्ते यावेळी वृक्षारोपण देखील होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या जीवन कार्यावर आधारित चित्र प्रदर्शनी देखील यावेळी सर्वांसाठी भरविण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमास सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठया संख्येनं उपस्थित रहावं असं आवाहन भाजपच्या वतीनं करण्यात आलं आहे.

शनिवारी बीडमध्ये स्वच्छता मोहिम

पंकजाताई मुंडे शनिवारी २४ तारखेला बीड शहरात असणार आहेत. ‘सेवा पंधरवाडा’ अंतर्गत त्यांच्या उपस्थितीत दुपारी १२.३० वा. कंकालेश्वर मंदिर, शहेनशाहवली दर्गा व माळीवेस भागातील बौध्दविहार येथे स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असं आवाहन शहर भाजप शाखेनं केलं आहे. तत्पूर्वी सकाळी ११ वा. दैनिक लोकप्रभा ने आयोजित केलेल्या सन्मान सोहळ्यास पंकजाताई उपस्थित राहणार असून दुपारी ३ वा मांजरसुंबा येथे ऊसतोड मुकदम संघटनेच्या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत.
••••

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!