Uncategorized

सौताडा ग्रामपंचायतला मिळालेले स्मार्ट ग्राम समृद्धीचे पाच लाख गायब, सरपंच-ग्रामसेवकांनी बोगस कामे दाखवून मारला पाच लाखावर डल्ला

बीड : लोकाशा न्यूज

सौताडा ग्रामपंचायत ला काही महिण्या पूर्वी स्मार्ट ग्राम समृद्धी अंतर्गत हागणदारी मुक्तीसाठी दहा लक्ष रुपयाचे बक्षीस मिळाले होते. हे पैसे सौताडा ग्रामपंचायत अंतर्गत येणारे भुरेवाडी घुलेवाडी सौताडा येथे स्वच्छतेसाठी खर्च करण्यासाठी उपयोगामध्ये आणता येणार होते .पण मागील ग्रामसेवक व सरपंच यांनी कुठलेही स्वच्छतेचे काम न करता .बक्षीस म्हणून आलेले दहा लाख रुपये पैकी पाच लाख रुपये इतरत्र खर्च केल्याचे दाखवून पाच लाखाचा भ्रष्टाचार केला असुन यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी पाटोदा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी
यांच्या कडे एका निवेदना च्या माध्यमातून सौताडा येथील सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब शिंदे व सतीश उबाळे यांनी केली आहे. सौताडा ग्रामपंचायत गेली पाच वर्षापासून अनेक भ्रष्टाचाराच्या मुद्द्यामुळे गाजत आहे यामध्ये बोगस झाडे लावणे कामे न करताच बिले उचलणे . नवीन मोटर खरेदी केल्या म्हणून पैसे उचलणे दलित वस्ती येथे मोटर टाकले म्हणून पैसे उचलणे असे अनेक गैर प्रकार या ग्रामपंचायत मध्ये झाले आहेत. मागील वर्षी सौताडा भुरेवाडी घुलेवाडी कागदोपत्री हागणदारी मुक्त दाखवून स्मार्ट ग्राम समृद्धी योजनेचे दहा लक्ष रुपये बक्षीस मिळवले होते वास्तविक पाहत हे दहा लाख रुपये सौताडा घुलेवाडी भुरेवाडी च्या स्वच्छतेसाठी वापरणे गरजेचे होते. पण तत्कालीन ग्रामसेवक व सौताडा गावचे सरपंच यांनी यातील पाच लाख रुपये निधी हा इतर तर काहीही खर्च दाखवून गायब केले आहेत या मुळे. संबंधित भ्रष्टाचार करणारे ग्रामसेवक व सरपंच यांनी केलेल्या पूर्ण व्यवहाराची चौकशी करून त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सतीश उबाळे व अण्णासाहेब शिंदे यांनी केले आहे

====================
चौ क ट

सौताडा ग्रामपंचायत अंतरंगत अनेक कामे बोगस केले असुन केलेले कामे हे अत्यन्त निकृष्ट दर्जाचे आहे भुरेवाडी येथील अंगणवाडी दुरुस्ती व नवीन खोली काही महिन्या पूर्वी झाली आहे पण या पावसात अंगणवाडी पुर्ण गळत असुन लहान मुलाचा खाऊ भीजलेला आहे या मुळे सौताडा ग्रामपंचायत चे ग्रामसेवक सरपंच यांची चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी आमची मागणी आहे

आण्णासाहेब शिंदे

लेटेस्ट न्यूज

error: Content is protected !!